Health Care News : हार्मोनल असंतुलन दूर करण्यासाठी महिलांनी 'या' गोष्टींचा आहारात समावेश करावा

महिलांनो हार्मोनल असंतुलनाकडे कधीही दुर्लक्ष करू नका...
Health Care News : हार्मोनल असंतुलन दूर करण्यासाठी महिलांनी 'या' गोष्टींचा आहारात समावेश करावा

हार्मोनल संतुलनाचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. शरीरात हार्मोन्स संतुलित नसतील तर आपल्या संपूर्ण आरोग्यावर परिणाम होतो. शरीरात सतत हार्मोन्समध्ये बदल होत असतात. पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या शरीरात ते जास्त लवकर बदलतात. महिलांच्या हार्मोनल आरोग्यासाठी इस्ट्रोजेन हार्मोनची योग्य पातळी आवश्यक आहे. त्याचे व्यवस्थापन करण्यात काही पदार्थ विशेष भूमिका बजावतात. महिलांनी त्यांचा आहारात समावेश करावा.

फायबर रिच फूड्स

फायबरयुक्त पदार्थ शरीरातील इस्ट्रोजेनचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करतात. शरीरातून अतिरिक्त इस्ट्रोजेन काढून टाकण्यासाठी हे आवश्यक आहेत. इस्ट्रोजेनचे जास्त प्रमाण शरीराच्या अनेक कार्यांवर परिणाम करू शकते. अशा परिस्थितीत फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.

Health Care News : हार्मोनल असंतुलन दूर करण्यासाठी महिलांनी 'या' गोष्टींचा आहारात समावेश करावा
Health Care News : पीसीओएसची समस्या आणि मासिक पाळीच्या वेदनांपासून रहाल दूर! रोज करा ही योगासने

क्रूसिफेरस भाज्या

ब्रोकोली, कोबी आणि फ्लॉवर सारख्या क्रूसीफेरस भाज्या देखील शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोन संतुलित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. या भाज्यांमध्ये काही घटक आढळतात, जे इस्ट्रोजेन मेटाबॉलिजम आणि संतुलनासाठी आवश्यक असतात.

हेल्दी फॅट्स

शरीर निरोगी ठेवण्यासाठी हेल्दी फॅट्स आवश्यक असतात. तुमच्या आहारात अ‍ॅवोकॅडो, फॅटी फिश आणि नट्स यांसारख्या हेल्दी फॅट्सचा समावेश करा. यामुळे हार्मोनल संतुलन राखण्यास मदत होते.

फ्लॅक्स सीड्स

फ्लॅक्स सीड्समध्ये लिग्नॅन्स असतात आणि त्यात अनेक गुणधर्म असतात जे इस्ट्रोजेन पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. तुम्ही या गोष्टींचा तुमच्या आहारात अनेक प्रकारे समावेश करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com