'या' पाच सवयींमुळे तुमची पीरियड सायकल डिस्टर्ब होऊ शकते...

बहुतेक महिलांना मासिक पाळीशी निगडित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते
Health news
Health news
Summary

बहुतेक महिलांना मासिक पाळीशी निगडित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

तुमची मासिक पाळी ही वेळेवर येत नसेल तर काय आहेत त्याची कारणे हेच शोधण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहोत. तुमच्यात कोणत्या अशा वाईट सवयी आहेत की, ज्यामुळे तुमची पीरियड सायकल डिस्टर्ब होते ते सविस्तर जाणून घेऊया.

मासिक पाळीच्या काळातील आरोग्य

बहुतेक महिलांना मासिक पाळीशी निगडित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यात मासिक पाळी उशिरा येणे, मासिक पाळी अनेक महिने न येणे अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात. जर तुमच्या मासिक पाळीत काही महिन्यांचे अंतर पडले किंवा मासिक पाळी दरम्यान अति त्रास व्हायला लागला तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो. खरं तर तुम्हाला मासिक पाळीत असा त्रास होणे हे तुमच्या काही वाईट सवयींचे प्रमुख लक्षण असू शकते.

Health news
जागतिक सिकल सेल डिझिज दिवस : राज्यामध्ये एससीडीविषयीची जागरुकता अधिक वाढविण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

तुम्ही जर का या सवयी बदलण्याचा प्रयत्न केला आणि त्या सुधारण्यावर भर दिला तर तुमची पीरियड सायकल सुरळीत होऊ शकते. अन्यथा ही समस्या काळानुसार अधिक प्रमाणात वाढू शकते. जाणून घेऊया कोणत्या अशा सवयी आहेत ज्या मासिक पाळीत अडथळा ठरतात.

1) अति झोप घेणे

अमेरिकन मॉडेल रेचेल फिंचने खुलासा केला की, एका महिलेला तिच्या करिअरच्या सुरुवातीला जवळपास 12 तास झोपण्याची सवय होती. या सवयीमुळे तिच्या जीवनशैलीवर अनेक विपरीत परिणाम झाले. त्यापैकी एक म्हणजे खूप महिने मासिक पाळी न येणे. त्यामुळे अति झोप घेणे टाळावे.

2) वजनात झपाट्याने बदल होणे (कमी अथवा जास्त)

जेव्हा तुमच्या वजनात एकदम झपाट्याने बदल होतो, तेव्हा त्याचा परिणाम तुमच्या मासिक पाळीवर देखील होतो. झपाट्याने वजन कमी झाल्यामुळे किंवा वाढल्यामुळे शरीरात अनेक बदल होतात. त्यामुळे तुमची पीरियड सायकल देखील बदलू शकते. म्हणजेच काय तर तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त व्यायाम करत असाल किंवा तुमच्या वजनाकडे अजिबात लक्ष दिले नाही तर त्यामुळे देखील तुमची मासिक पाळी अनियमित होऊ शकते.

Health news
लाल रक्तपेशींतील दोषामुळे ‘सिकलसेल’ चा आजार

3) पौष्टिक आहार न घेणे

उत्तम आहार हे उत्तम आरोग्याचे रहस्य आहे. जर तुमचा आहार योग्य नसेल तर त्याचा फटका तुमच्या शरीराला अन् तुम्हाला सहन करावाच लागतो. तुम्ही जर सतत बाहेरचे जंक फूड जास्त खात असाल किंवा तुमच्या आहारात आवश्यक त्या पोषक तत्वांचा समावेश नसेल तर त्याचा परिणाम तुमच्या मासिक पाळीवर होतो.

4) मानसिक तणाव

तुम्ही घेत असलेल्या मानसिक तणावामुळे तुमच्या शरीराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आरोग्यासाठी हानीकारक असणारा मानसिक ताण हा देखील पीरियड सायकलवर परिणाम करू शकतो. त्यामुळे तुमच्यासाठी तणाव कमी करुन तणावमुक्त राहणे फार गरजेचे आहे. जर का तुम्ही जास्त मानसिक ताण घेतला तर तुमच्या मासिक पाळीवर होऊ शकतो.

Health news
पुरुषांपेक्षा स्त्रियांचं वजन कमी होणं अवघड? जाणून घ्या सत्य…

5) गर्भनिरोधक गोळ्याचे अतिसेवन

अनेक मुली लग्नाआधी गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या मोठ्या प्रमाणात घेतात. गर्भनिरोधक गोळ्यामुळे तुमच्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते. त्यामुळे मग तुम्हाला अनियमित मासिक पाळीची समस्या उद्भवते. तुम्ही जर का तुमच्या या सवयी बदल्यण्याचा प्रयत्न केला तर तुमची मासिक पाळी नियमित येऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com