Health Tips : साखरेपासून ब्रेकअप केलंय? या पदार्थांनी वाढेल जीवनात गोडवा!

साखरेत असलेल्या कॅलरीज आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहेत
Health Tips
Health Tipsesakal

साखर खाण्याचे अनेक दुष्परीणाम लोकांच्या लक्षात येऊ लागले आहेच. साखरेने वजन वाढते, शुगरचा त्रास होतो. वजन वाढल्याने किंवा डॉक्टरांनी सांगितल्यामुळे आज अनेक लोक साखरेपासून ब्रेकअप  करत आहेत.

साखर खायची नाही हे जरी मनाला पटवून दिलं तरी काही लोकांना गोड काहीतरी खाण्याची इच्छा सतत होत असते. पण, साखरेत असलेल्या कॅलरीज आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहेत. त्यामूळे साखर खाणे कितीही आवडत असेल तरी ती बाजूला ठेवणे कधीही चांगले.

Health Tips
Health Tips : जास्त पाणी प्यायल्यानेही शरीराचं नुकसान होतं

साखर बंद केली म्हणजे आयुष्यातील गोडवा निघून गेला, असे वाटून नाराज होऊ नका. साखरेच्या ऐवजी अनेक अशा गोष्टी आहेत ज्या तूम्हाला गोड चव देऊ शकतात. त्या गोष्टी खाल्ल्याने कोणतेही साईड इफेक्ट्स होणार नाहीत. त्यामूळेच आरोग्याच्या बाबतीत साठी जागरूक असलेले लोक साखरे ऐवजी काही वेगळे पर्याय निवडतात. ते कोणते पाहुयात.

Health Tips
Child Health : मूल जन्मल्यानंतर ५ दिवसांच्या आत करून घ्या ही तपासणी; नाहीतर होतील गंभीर आजार

गूळ

साखर ज्या ऊसापासून बनवली जाते त्यापासूनच गूळही बनवला जातो. या दोन्ही गोष्टींची निर्मीती एकाच पदार्थापासून होत असली तरी त्यांचे गुणधर्म वेगवेगळे आहेत. कारण, साखरे असलेल्या कॅलरीज गूळामधून आपल्याला मिळत नाहीत त्यामूळे चहा, किंवा इतर कोणत्या पदार्थाला गोड बनवण्यासाठी गूळाचा पर्याय बेस्ट आहे.

Health Tips
Health: रोजच्या जेवणात किती मीठ असावं? 

खजूर

नैसर्गिक गोडवा असलेले फळ म्हणून खजूराकडे पाहिले जाते. साखरेऐवजी आपण खजुराचा वापर करू शकतो, कारण यात पोटॅशिअम, जीवनसत्त्व ब६ आणि कॅल्शियम असतं.  खजूर आपली साखरेची तल्लफ सहज कमी करू शकतो. तसंच यात लोहाचं प्रमाण अधिक असल्यानं, त्यापासून आपणास ताकदही मिळते. त्यामूळे साखरेऐवजी खजूराचा नक्की विचार करा.

Health Tips
Coconut Sweet: दिवाळीत Sugar Free नारळाचे लाडू खा! शुगर कंट्रोलही होईल, वाचा रेसिपी

मध

मधाचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे आहेत. त्यामूळेच साखरेऐवजी मधाचा विचार करणे कधीही चांगले.  मधामध्ये जीवाणूनाशक, अँटी-ऑक्सिडंट आणि कवकरोधी असे गुण असतात.
चहा, दूध, लिंबाचं सरबत यामध्ये साखरेऐवजी मधाचा वापर करता येऊ शकतो.

Health Tips
Sugar Craving : जेवणानंतर तुम्हालाही गोड हवंच असतं? असू शकतात 'या' गंभीर आजारांचे संकेत

ऊस

सरबत, ज्यूस यामध्ये हमखास साखर घातली जाते. त्यामूळे सरबत पिणे चांगले असले तरी साखरेमुळे शरीराला त्याचा फायदा होत नाही. तर, नुकसानच जास्त होते. त्यामूळे सरबताला लांब ठेऊन तूम्ही ऊसाच्या रसाचे सेवन करणे फायद्याचे ठरते.

Health Tips
Health Tips : घरच्या शिळ्या चपात्या खाऊन करता येतं BP, Sugar कंट्रोल

कोकोनट साखर

नारळाच्या झाडाच्या कळ्यांतून निघणार्‍या रसापासून ही साखर बनवली जाते. तिला कोकोनट पाम शुगर असंही म्हटलं जाते. ही करड्या रंगाची असते आणि यात पोटॅशियम, जस्त, मॅग्नेशियम, लोह असतं. ही साखर बहुत करून केक, पुडिंग इत्यादी बेकरीचे पदार्थ बनवण्यासाठी वापरतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com