
Health Tips : तूमच्या पाण्याच्या बाटलीवर टॉयलेट सीटपेक्षाही जास्त बॅक्टेरिया? संशोधकांचा दावा
कडक उन्हाळ्याची चाहुल लागायाला सुरूवात झाली आहे. त्यामूळे हिवाळ्यात कपाटात ठेवलेल्या पाण्याच्या बाटल्या आता फ्रिजमध्ये दिसत आहेत. प्रवासाला कुठेही बाहेर पडलं, मुलांसोबत प्रवास करताना, त्यांना शाळेला पाठलताना आपण सोबत पाण्याची बाटली देतो. सध्या पाण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात असतात. त्यामूळे मुलांच्या आकर्षक वॉटर बॉटलही प्लास्टिकच्याच असतात. (Lifestyle)
याच प्लास्टिकच्या बाटल्या तूम्हाला आणि मुलांना आजारी पाडू शकतात. कारण, टॉयलेट सीट पेक्षाही अधिक बॅक्टेरिया तूमच्या पाण्याच्या बाटलीवर असतात, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अमेरिकेतील वॉटरफिल्टरगुरु डॉट कॉमच्या संशोधकांच्या पथकाने पुन्हा वापरता येणाऱ्या पाण्याच्या बाटल्यांच्या स्वच्छतेची तपासणी केली. त्यांच्या संशोधनातच हा खुलासा झाला आहे.
संशोधनात, बाटलीच्या सर्व भागांची म्हणजेच तिचा वरचा भाग, झाकण, तोंड तिन वेळा तपासले. त्यावेळी बाटलीवर दोन प्रकारचे बॅक्टेरिया आढळून आले. ज्यात ग्राम-नकारात्मक बॅक्टेरिया आणि बॅसिलस बॅक्टेरिया यांचा समावेश आहे. हे दोन्ही बॅक्टेरिया तूमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायर्नमेंटल हेल्थ सायन्सच्या मते, प्लास्टिकच्या बाटल्या बनवण्यासाठी बीपीए नावाचे रसायन वापरले जाते.

प्लास्टीक बाटली बनवण्यासाठी वापरतात बीपीए रसायन
या बॅक्टेरियामूळे काय होऊ शकते
ग्राम-नकारात्मक जीवाणू विविध प्रकारच्या संसर्गास कारणीभूत असतात. बॅसिलस बॅक्टेरियामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या उद्भवू शकतात. तसेच, पोटदुखी, अॅसिडिटी, जुलाब, रक्तदाबाच्या तक्रारी सुरू होऊ शकतात.
या जंतुंमूळे हृदयविकाराचा धोका वाढतो. उलट्या, मळमळ यासारख्या समस्या असू शकतात. वारंवार मूत्रमार्गात संक्रमण होण्याचा धोकाही वाढतो, असेही संशोधकांचे म्हणणे आहे.
काय काळजी घ्याल
- तुम्ही तुमच्या घरात ज्या पद्धतीने इतर भांडी वापरता, त्याच पद्धतीने बाटलीची स्वच्छता करा.
- काही वेळा बाटली उन्हात वाळवायला ठेवा.
- पाण्याची बाटली दिवसातून किमान एकदा साबण, गरम पाण्याने किंवा आठवड्यातून एकदा स्वच्छ करणे आवश्यक आहे.
- प्लास्टिकच्या बाटलीचा वापर टाळा. त्याऐवजी काच किंवा तांब्याच्या बाटलीचा वापर करा. यामूळे जंतू वाढण्यास प्रतिबंध होईल.

तांब्याच्या बाटलीत पाणी पिणे फायदेशीर