Health Tips : हिवाळ्यात थंडीचा पारा घसरल्याने थेट होतो यकृतावर परिणाम; अशी घ्या काळजी

मोहरीचे हे गुणधर्म यकृतातील सूज आणि लालसरपणा कमी करतात.
Health Tips
Health Tipsesakal

Health Tips : आपल्या शरीरातील सगळेच अवयव महत्त्वाचे असतात. पण, त्यातील किडनी, मेंदू आणि हृदय  हे तिन्ही आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचे अवयव आहेत. या व्यतिरिक्त यकृत हा एक अवयव आहे ज्यामुळे आपले शरीर योग्य प्रकारे कार्य करू शकत नाही.

खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लोक लिव्हरशी संबंधित आजारांनी त्रस्त आहेत. परंतु आरोग्य तज्ज्ञांच्या मते केवळ खराब जीवनशैलीच नाही तर बदलत्या हवामानामुळेही यकृत खराब होऊ शकते.

थंड हवामानात यकृत खराब होण्याचा धोका वाढतो. कारण जेव्हा तापमान कमी होते तेव्हा यकृत योग्यरित्या कार्य करू शकत नाही, ज्यामुळे यकृताशी संबंधित समस्यांचा धोका असतो. पण योग्य आणि संतुलित आहार घेतल्यास या समस्येपासून मुक्ती मिळू शकते. तुम्हाला तुमचे यकृत निरोगी ठेवायचे असेल तर काही भाज्यांचा आहारात समावेश करा.

Health Tips
Foods for Liver Health : हळद, कॉफीसह ‘या’ २ गोष्टींचा आहारात करा समावेश; यकृत राहील निरोगी

मोहरीची पालेभाजी

हिवाळ्यात तुम्ही अनेक पालेभाज्या खाऊ शकता. ज्या फ्रेश आहेत पण त्यातही मोहरीची पालेभाजी आवर्जून खाल्ली पाहिजे. दिल्ली, पंजाब येथे ‘सरसो का साग’ फेमस आहे. हिरव्या मोहरीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात. मोहरीचे हे गुणधर्म यकृतातील सूज आणि लालसरपणा कमी करतात.

फुलकोबी

फुलकोबी हिवाळ्यातही येते. यकृताच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुमच्या आहारात फुलकोबीचा समावेश करा. फुलकोबीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट यकृतातील एन्झाईम सुरू करण्यास मदत करतात. त्यामुळे यकृतातून विषारी पदार्थ बाहेर पडतात.

Health Tips
Healthy Liver Tips : फॅटी लिव्हरची समस्या असलेल्यांनी या पदार्थांची करावी गट्टी, फरक पडतो!

कांदा

कच्चा कांदा खाल्ल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो. पण ते यकृतासाठीही तितकेच फायदेशीर आहे. कांद्यामध्ये अनेक विशेष घटक आढळतात, जे यकृत खराब होण्यापासून वाचवतात. कांदा विशेषतः हिवाळ्यात खावा.तुम्ही तो सलाडच्या स्वरूपात किंवा इतर भाज्यांसोबत मिसळून खाऊ शकता.

पालक

हिरव्या भाज्या पालकामध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते. पालकामध्ये अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात, त्यातील काही घटक यकृत निरोगी ठेवण्यास मदत करतात.

Health Tips
Liver Detox Drink : यकृताच्या निरोगी आरोग्यासाठी 4 हेल्दी ड्रिंक्स, अनेक आजारांचा धोका होईल कमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com