Healthy Spices : प्रत्येकाच्या घरातच दडलाय एक दवाखाना? आपण कधी नीट पाहिलाच नाही

मेथी दाणे, ओवा अन् बरंच काही गुणकारी
Healthy Spices
Healthy Spicesesakal

Healthy Spices :

आजकाल व्हायरल आजारांचा, साथीच्या रोगांचा शिरकाप पटकन होतो. साथीच्या आजारांनी तर एकाच घरातले अनेकजण दवाखान्यात दाखल होतात. अशा रूग्णांनी शहरातीलच नव्हे तर तालुका गाव पातळीवरचे दवाखानेही भरले आहेत. वातावरण बदलामुळे होणारे आजारांचाही यात समावेश असतो. घरातील लहानांसह तरूण अन् वृद्धही अशा आजारांना बळी पडत आहेत.

साथीच्या आजारांवर अनेक उपचार केले जातात. ज्यात महागड्या औषधांचाही समावेश असतो. खरं तर मोठे आजार आपल्या हातात नसतात. पण काही छोट्या आजारांवर घरात असलेला दवाखाना नक्की उपयोगी येतो.

Healthy Spices
Karnataka Issues Health Advisory: उष्णतेची लाट! बेंगळुरूमध्ये पाणीटंचाई; पाण्याच्या टँकरच्या दरात दुपटीने वाढ, सरकारने जारी केली ॲडव्हायझरी

पण आपल्या घरात असलेल्या दवाखान्यात म्हणजेच आपल्या स्वयंपाकघरात अनेक असे पदार्थ आहेत. जे आपल्या आजारात उपयोगी पडणार आहेत. आज आपण त्यांचेच काही फायदेशीर उपयोग पाहुयात.

ओवा

  1. ३ ग्रॅम ओवा थोडा भाजून तो दूध किंवा पाण्यासोबत घेतला तर सर्दी, पडसे किंवा पोटदुखीच्या आजारात फायदा होतो.

  2. ३ ग्रॅम ओव्याची पावडर ताकाबरोबर घेतली तर पोटातील जंत नष्ट होतात

Healthy Spices
Health Care News : जिममध्ये जाण्याचा कंटाळा येतोय? मग ट्राय करा 'हे' 4 व्यायाम; हृदय अन् मन राहील निरोगी

वेलची

  • तोंड आले असेल, छाले पडले असतील तर वेलची उपयोगी पडते. वेलची वाटून घेऊन त्यात मध मिसळून तोंडाला लावल्यास फायदा होतो.

  • ३ ग्रॅम वेलची वाटून त्यात खडीसाखर मिसळून लावल्यास लघवीच्या जागेला होणारी जळजळ थांबते.

Healthy Spices
Health Care News : पीसीओडीची समस्या आहे? मग 'या' हेल्दी स्मूदीजचा आहारात समावेश करा; वजन राहील नियंत्रणात

काळी मिरी

  1. जास्त खोकल्यामुळे झोप उडाली असेल तर दोन तीन काळी मिरी तोंडात ठेवव्यात. लाळेसोबत त्या चोखून खाल्ल्यात तर खोकला कमी होतो आणि झोपही लागते.

  2. उचकी आणि डोकेदुखी असेल तर काळी मिरीच्या ३ ४ दाण्यांना जाळून त्याच्या धुराची वाफ घ्यावी. यामुळे डोकेदुकी थांबते.

दालचिनी

  • दालचिनी पचन शक्ती वाढवते. आणि सर्दी खोकल्यावरही गुणकारी ठरते.

  • दालचिनीच्या पावडरीत मध घालून तो चाटून खावा. यामुळे खोकल्यावर आराम मिळतो.

Healthy Spices
Sleep and Mood: झोपेचा Mood वर, mental health वर कसा परिणाम होतो? | World Sleep Day 2024

मेथी दाणे

  1. एक चमचा मेथी दाणे रात्रभर भिजवून सकाळी ते पाणी प्या. आणि मेथीचे दाणे चावून खा. यामुळे मधुमेह, वाढलेले वजन यावर नियंत्रण मिळवता येते.

  2. मेथी दाणे भाजून,वाटून कॉफीप्रमाणे काढा बनवून त्यात थोडे आले मिसळून प्यावे. यामुळे सर्दी, खोकल्याचा त्रास कमी होतो.  

Healthy Spices
Health Care News : ओठांवर वारंवार येतो घाम? काय असू शकतं कारण? जाणून घ्या उपाय

लिंबू

  • लिंबाच्या रसात मध मिसळून लावल्याने चेहऱ्यावरील मुरूम, पुटकुळ्या निघून जातात.

  • ज्या महिलांना मासिक पाळीत अति रक्तस्त्रावाचा त्रास होतो. त्यांनी कोमट दूधात लिंबूचा रस मिसळून त्याचे सेवन करावे. त्यामुळे रक्तस्त्रावात सुधारणा होते.

  • लिंबाच्या रसात थोडे आले व थोडे मीठ मिसळून जेवणाबरोबर घेतल्यास भूक वाढते.

(संबंधित उपाय हे आचार्य बालकृष्ण लिखित औषध- दर्शन या पुस्तकातून घेण्यात आले आहेत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com