अभ्यासकांचा दवा : स्मृतिभ्रंशवर प्रभावी ठरू शकते एचआयव्हीचे औषध

HIV medication can be effective on memory
HIV medication can be effective on memoryHIV medication can be effective on memory

आपला मेंदू अनेक आठवणींना कैद करून ठेवतो. त्यामुळे एखादा महत्त्वाचा क्षण पुन्हा आठवला की त्याच्याशी निगडीत अनेक आठवणी ताज्या होतात. परंतु, जसजसे वय वाढू लागते तसतशी स्मरणशक्तीही (memory loss) कमकुवत होऊ लागते. यामुळेच वाढत्या वयात स्मरणशक्ती कमी होणे म्हणजेच स्मृतिभ्रंश यासारखे मानसिक आजार शरीरात स्थान निर्माण करतात. मात्र, स्मरणशक्ती कमी होण्यावर एचआयव्हीचे (HIV) औषध प्रभावी ठरू शकते, असे एका अभ्यासातून पुढे आले आहे. (HIV medication can be effective on memory)

स्मृतिभ्रंश हा एक आजार आहे. ज्यामध्ये आपण आपल्या जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी आणि घटना विसरतो. यामुळे त्रस्त असलेल्या लोकांना नवीन आठवणी तयार करण्यात अडचण येते. तसेच जुन्या लक्षात ठेवण्यासही त्रास होतो. अशा लोकांना तथ्ये किंवा भूतकाळातील अनुभव लक्षात ठेवता येत नाही.

HIV medication can be effective on memory
Caste Census Bihar : सर्व धर्माच्या जाती-पोटजातींची मोजणी होणार

मात्र, कॅलिफोर्निया लॉस एंजेलिस विद्यापीठातील संशोधकांनी नवीन अभ्यासात आठवणींना जोडण्यासाठी जबाबदार विशेष आण्विक यंत्रणा शोधून काढली आहे. अभ्यासानुसार, मध्यम वयात मानवी स्मरणशक्ती (memory loss) मजबूत करण्यासाठी आणि स्मृतिभ्रंशाच्या पहिल्या टप्प्यात प्रतिबंध करण्याबाबत नवीन पद्धती सांगण्यात आल्या आहेत. या अभ्यासाचे निष्कर्ष ‘नेचर’ या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

अभ्यास कसा झाला?

संशोधकांनी सीसीआर-५ नावाच्या जनुकावर लक्ष केंद्रित केले. जे मेंदूच्या पेशींना एचआयव्हीची (HIV) लागण करण्यासाठी आणि एड्सच्या रुग्णांमध्ये आठवणी साठवण्याची क्षमता कमी करण्यासाठी जबाबदार आहे. स्मरणशक्तीशी (memory loss) संबंधित आजारांनी ग्रस्त असलेल्या उंदरांवर संशोधनादरम्यान संशोधकांनी सीसीआर-५ जनुक काढून टाकले. तेव्हा ते पुन्हा आठवणी जोडू शकले. या प्रयोगादरम्यान २००७ मध्ये एचआयव्हीच्या उपचारांसाठी मंजूर केलेले माराविरोक हे औषध वापरले गेले. ज्याने उंदरांच्या मेंदूतील सीसीआर-५ जनुक दाबले.

HIV medication can be effective on memory
हार्दिक पटेलवर काँग्रेसचा गंभीर आरोप; आम्ही सन्मान दिला तर...
आठवणी आमच्याशी निगडित घटनांचा एक मोठा भाग आहे. संबंधित अनुभवांना जोडण्याची क्षमता आपल्याला सुरक्षित कसे राहायचे आणि जगातील गोष्टी कशा चालवायचे हे शिकवते.
- अल्सिनो सिल्वा, शिक्षक युनिव्हर्सिटीच्या डेव्हिड गेफेन स्कूल ऑफ मेडिसिनमधील न्यूरोबायोलॉजी आणि सायकोथेरपी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com