Home Remedies : शरीरात लपलेलं Uric Acid शोधून शोधून वितळवेल ही भाजी, जाणून घ्या कसे करावे सेवन

घरगुती उपायांचा अवलंब करून आपण यूरिक ऍसिडचे प्रमाण वाढणे थांबवू शकतो
Home Remedies for uric acid
Home Remedies for uric acidesakal

Home Remedies :

खराब जीवनशैली आणि योग्य आहारामुळे आजकाल बहुतेक लोकांना युरिक ऍसिडच्या समस्येला सामोरे जावे लागते. युरिक ऍसिड हे शरीरात तयार होणारे एक प्रकारचे रसायन आहे, जे शरीरात प्युरीन नावाच्या रसायनाच्या विरघळल्याने तयार होते.

युरिक ऍसिड ही देखील यातील एक समस्या आहे. हे जास्त प्रमाणात प्युरीनयुक्त पदार्थ खाल्ल्याने होते. जरी प्युरिन किडनीद्वारे फिल्टर होऊन मूत्रात बाहेर पडतात, परंतु जेव्हा मूत्रपिंड योग्यरित्या कार्य करत नाही तेव्हा हे क्रिस्टल्स सांध्यामध्ये जमा होतात. (Uric Acid)

Home Remedies for uric acid
Uric Acid Control Tips : युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी ‘या’ भाज्यांचा करा आहारात समावेश

शरीरात युरिक अॅसिडचे प्रमाण वाढले की अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे त्या व्यक्तीला पायात सूज येणे, हात-पाय दुखणे आणि कडक होणे, जळजळ आणि पाय दुखणे अशी लक्षणे दिसू लागतात.

शरीरातील वाढलेले युरिक अॅसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी काही लोकांना औषधांची गरज भासते, मात्र आहार आणि जीवनशैलीत बदल करून ही समस्या नियंत्रणात राहते. काही घरगुती उपायांचा अवलंब करून आपण यूरिक ऍसिडचे प्रमाण वाढणे थांबवू शकतो.

Home Remedies for uric acid
Yoga For Acidity : अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळवण्यासाठी दररोज ही योगासने करा!

Uric Acid समूळ नष्ट करण्यासाठी कारल्याच्या भाजीचा वापर करता येतो. कारल्याची भाजी तशी कडवटच लागते, पण काही आजारांवर कारले गुणकारी आहे. युरिक ऍसिडमध्ये कारले कसे फायदेशीर आहे हे पाहुयात.

कारल्यात कोणते व्हिटॅमिन्स असतात

कारल्यामध्ये व्हिटॅमिन सी, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि बीटा-कॅरोटीनसह अनेक औषधी गुणधर्म असतात. कारल्याच्या सेवनाने रक्त शुद्ध होण्यास मदत होते. शरीरातून यूरिक ऍसिड काढून टाकण्यासाठी हे प्रभावी आहे.

कारल्याचा रस नियमितपणे प्यायल्याने जास्त प्रमाणात यूरिक ॲसिड आणि सांधेदुखी आणि सूज या समस्येपासून आराम मिळतो. यूरिक ॲसिड जास्त असल्यास, तुम्ही कारल्याचा रस तयार करून सकाळी प्यावा.

त्यामुळे सांधेदुखी आणि सूज येण्याची समस्या उद्भवते. जास्त यूरिक ऍसिडच्या समस्येवर मात करण्यासाठी, तुम्ही कारल्याच्या रसाची मदत घेऊ शकता. हे यूरिक ऍसिड नियंत्रित करण्यास मदत करते.

Home Remedies for uric acid
'येथील' द्राक्ष पट्ट्यात दोडका अन्‌ कारले तेजीत ! अवघ्या 30 गुंठ्यात लाखाचे उत्पन्न 

कसा बनवावा कारल्याचा रस

  • कारल्याचा रस बनवण्यासाठी २-३ कारले घ्या

  • कारले मधून कापून त्याच्या बिया काढून घ्या

  • कारल्याचे मोठे तुकडे करून त्यात अर्धा कप पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या

  • जर पेस्ट खूप घट्ट असेल तर त्यात जास्त पाणी घाला

  • रस गाळून घ्या आणि त्यात लिंबाचा रस आणि चिमूटभर मीठ टाकून प्या

Home Remedies for uric acid
अत्याधुनिकतेच्या जोरावर कडू कारले बनले गोड

कारल्याचा रस पिण्याचे इतर फायदे

मधुमेहाच्या रुग्णाने कारल्याचा रस प्यावा.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कारल्याचा रस पिणे देखील चांगले आहे. त्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते.

यकृताला घाणीपासून स्वच्छ करण्यासाठी आणि त्याची कार्यक्षमता सुधारण्यासाठी कारल्याच्या रसाचा नित्यक्रमात समावेश करावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com