Improve Digestion System: पचनसंस्था सुरळित राहण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय

Improve Digestion System: बद्धकोष्ठता, अपचन आणि अॅसिडिटीपासून सुटका हवी असेल तर पुढील घरगुती गोष्टींचा वापर करावा.
Digestion
DigestionSakal

home remedies how to make digestive system strong

शरीरातील अनेक आजारांची सुरूवात पोटापासून होत असते. पोटदुखीमुळे शरीराला अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. अपचन, बद्धकोष्ठता, अॅसिडिटी यासारख्या निर्माण होऊ शकतात. जर तुम्हाला पोटासंबंधित त्रास असेल तर घरगुती पेयांचे सेवन करू शकता. यामुळे पचनसंस्था सुरळित कार्य करते.

  • लिंबू पाणी

उन्हाळ्यात लिंबू पाणी पिणे फायदेशीर असते. यामुळे शरीर हायड्रेट राहते.पचनसंस्था सुरळित राहण्यासाठी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिकस करून सकाळी रिकाम्या पोटी प्यावे. यामुळे पोटातील गॅसची समस्या कमी होते. यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करावा आणि प्यावा.

  • जिरं पाणी

जिऱ्याचे पाणी प्यायल्याने पोट आणि पचन चांगले राहते. यामुळे गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो. यासाठी दोन कप पाण्यात एक चमचा जिरं टाकून उकळावे. पाणी अर्धे होईपर्यंत उकळा नंतर गाळावे आणि कोमट प्यावे.

Digestion
Side Effects Of Sitting Long Time: जास्त वेळ एकाच ठिकाणी बसून काम केल्यास होऊ शकतात 'हे' आजार
  • ग्रीन टी

अनेक लोकांची सकाळ चहा किंवा कॉफीने होते. यामध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते. यामुळे शरीरातील उष्णता वाढू शकते. याएवजी तुम्ही ग्रीन टीचे सेवन करू शकता. ग्रीन टी प्यायल्याने गॅस आणि अॅसिडिटीची समस्या कमी होते.

  • आल्याचा चहा

आल्याचा चहा प्यायल्याने अनेक आरोग्यासंबंधित समस्या दूर होतात. यामध्ये अँटी ऑक्सिडंट गुणधर्म असतात. यामुले पोटासंबंधित समस्या दूर होतात. यामुळे गॅसची समस्या देखील दूर होते. हा चहा बनवण्यासाठी आल्याचा एक तुकडा घ्या आणि तो किसून घ्या आणि पाण्यात टाका. पाणी चांगले उकळून घ्यावे आणि कोमट झाल्यावर प्यावे. तुम्ही चवीसाठी मध देखील मिक्स करू शकता.

  • ओव्याचे पाणी

पोटाच्या समस्यांवर मात करण्यासाठी ओव्याचे पाणी पिणे फायदेशीर ठरते. हे पाणी प्यायल्याने पोटदुखी आणि गॅसची समस्या त्वरित कमी होते. ओव्याचे पाणी तयार करण्यासाठी एका ग्लास पाण्यात एक चमचा ओवा टाकून उकळावे. पाणी अर्धे होईपर्यंत उकळावे आणि कोमट झाल्यावर पाणी प्यावे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com