Home Tips: उंदरांमुळे त्रासले आहात 'हे' उपाय नक्की करून बघा

जर तुम्ही उंदरांमुळे त्रासले असाल तर या कही इफेक्टीव्ह उपायांची मदत घेऊ शकतात. जाणून घेऊया उपाय.
Home Tips
Home Tipsesakal

घरात एकदा का उंदिर घुसला की, प्रत्येक गोष्ट कुरतडली जाते. मग वस्तू किमती असली तरी ती वाया जाते. अन्ना जर उंदराने तोंड लावले तर इन्फेक्शनचाही धोका असतो. अशात जर घरात उंदिर घूसला तर त्याला बाहेर काढण्याच्या ट्रिक्स शोधल्या जातात. आज आम्ही उंदिर पळवण्याच्या काही सोपे उपाय सांगणार आहोत.

Home Tips
Home Tips : घरात झुरळांनी वैतागले आहात? करून बघा 'हे' सोपे उपाय

उंदरांचा आतंक कसा कराल कमी

तुरटीने घालवा उंदिर

उंदिर घालवण्यासाठी तुरटीचा वापर करू शकतात. तुरटीची पावडर करा. नंतर त्याला गव्हाच्या पिठासोबत मळून त्याची कणीक बनवा. त्याच्या लहान लहान गोळ्या करून जिथे उंदिर येऊ शकतात अशा जागांवर ठेवा. त्यांच्या बीळाच्या तोंडाशी ठेवावे. या गोळ्या खाऊन उंदिर मरू शकतात.

Home Tips
Home Tips : करपलेल्या भांड्यांचे डाग जात नाही? करा कांद्याचे हे उपाय

डांबर गोळ्या

उंदिर पळवण्यासाठी डांबर गेळ्यांचा फायदा होतो. डांबर गोळ्यांच्या वासामुळे असलेले उंदिर पळून जातील. याची पावडर करून गव्हाच्या किंवा मैद्याच्या पिठात कालवून घ्या. या पिठाची कणीक मळून त्याच्या गोळ्या जागोजागी ठेवाव्या.

Home Tips
Home Tips : भिंतीवरील जाळ्यांनी वैतागलात? 'या' ट्रिक्स वापरा, लगेच मिळेल सुटका

इतर उपाय

उंदिर पळवण्यासाठी बेकिंग सोडा आणि पुदीन्याचा वापर केला जातो. यासाठी २ चमचे पीठ घ्या. त्यात पेपरमिंटचे तेल व बेकिंग सोडा कालवा. याच्या गोळ्या घरात टाका. उंदिर निघून जातील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com