कोण म्हणतं की पैशाने आनंद विकत घेतला जाऊ शकत नाही; जाणून घ्या, काय सांगते रिसर्च... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Happiness Tips

Happiness Tips : कोण म्हणतं की पैशाने आनंद विकत घेतला जाऊ शकत नाही; जाणून घ्या, काय सांगते रिसर्च...

Happiness Tips : आपण अनेकदा हे वाचले किंवा ऐकले असेल की व्यक्ती हा पैशाने वस्तू आणि सुविधा खरेदी करू शकतो पण आनंद नाही. मात्र नुकत्याच झालेल्या रिसर्चमध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या रिसर्चनुसार अनेक लोक पैशामुळे आनंदी असल्याचे समोर आले आहेत.

दोन प्रमुख तज्ञ डॅनियल काहनमॅन आणि मॅथ्यू किलिंग्सवर्थ यांनी केलेला रिसर्च या महिन्यात प्रकाशित करण्यात आला. त्यात ही बाब समोर आली आहे की जे लोक जास्त कमवतात, ते आनंदी असतात. (how money can buy happiness read story and research)

डॅनियल काहनमॅन आणि किलिंग्सवर्थने आपल्या स्टडीमध्ये 18 पासून 65 वर्षापर्यंत 33 हजार 391 लोकांचा सर्व्हे केला. हे लोक अमेरिकेत काम करणारे होते ज्यांचं वार्षिक इनकम 8 लाख होते.

किलिंग्सवर्थने या लोकांचा हॅप्पीनेस स्केल जाणून घेण्यासाठी एका स्मार्टफोनचा वापर केला. हा अॅप किलिंग्सवर्थने स्वत: तयार केला ज्याचं नाव ट्रॅक योर हॅप्पीनेस ठेवण्यात आलं होतं. यामध्ये सहभागी होणाऱ्यांना विचारण्यात आलं होतं तुम्हाला कसं वाटतं. त्यांचे उत्तर धक्कादायक होते.

या स्टडीनंतर रिसर्चमधून दोन बाबी समोर आल्या. एक म्हणजे अनेक लोकांचा पगार वाढल्यानंतर त्यांचा आनंद वाढतो तर दुसरी बाब म्हणजे 20 टक्के लोक आनंदी नव्हते. त्यांचा पगार वाढून सुद्धा ते आनंदी नव्हते.

किलिंग्सवर्थने आपल्या अभ्यासातून सांगितले की स्पष्टपणे दिसते की अनेक लोकांचा पगारवाढच त्यांना आनंद देतो. ज्यांच्याकडे गरजेपेक्षा जास्त पैसा आहे तो व्यक्ती आनंदी आहे.