Tatkal Passport : परदेशात फिरायला जाण्याचा विचार करताय? तात्काळ पासपोर्ट मिळवण्यासाठी असा करा अर्ज

तात्काळ पासपोर्ट काढण्यासाठी अर्ज कसा कराल? जाणून घ्या
Tatkal Passport : परदेशात फिरायला जाण्याचा विचार करताय? तात्काळ पासपोर्ट मिळवण्यासाठी असा करा अर्ज

पासपोर्ट हा केवळ एक महत्त्वाचा दस्तऐवज नाही तर भारत सोडून इतर कोणत्याही देशात जाण्यासाठी देखील आवश्यक आहे. तुम्हाला अचानक दुसर्‍या देशात जावे लागले आणि तुमच्याकडे पासपोर्ट नसेल तर काळजी करू नका, सरकार तुमच्यासाठी तत्काळ पासपोर्टची सुविधाही उपलब्ध करून देते.

तत्काळ पासपोर्ट म्हणजे काय आणि तुम्ही त्यासाठी अर्ज कसा करू शकता? आज आम्‍ही तुम्‍हाला याबद्दल माहिती देणार आहोत आणि त्‍यासोबतच तत्काळ पासपोर्टची फी किती आहे ते सांगणार आहोत.

Tatkal Passport : परदेशात फिरायला जाण्याचा विचार करताय? तात्काळ पासपोर्ट मिळवण्यासाठी असा करा अर्ज
Passport बनवण्यासाठी आजच डाउनलोड करा DigiLocker अॅप, सर्व काम होतील झटपट

तत्काळ पासपोर्टचा फायदा काय?

तत्काळ पासपोर्टद्वारे तुम्ही तुमचा पासपोर्ट पटकन बनवू शकता, अर्ज सबमिट केल्यानंतर तुमचा स्टेटस ग्रांटेड असल्यास तुमचा पासपोर्ट तिसऱ्या दिवशी पाठवला जाईल.

तत्काळ पासपोर्टसाठी अर्ज कसा करावा

अधिकृत पासपोर्ट सेवा वेबसाइटवर जा आणि नोंदणी करा

नोंदणी केल्यानंतर, आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.

यानंतर तुम्हाला New आणि Reissued असे दोन पर्याय मिळतील, नवीन पर्याय निवडा.

यानंतर तुम्हाला प्लॅन प्रकारातील तत्काळ पर्याय निवडावा लागेल.

तत्काळ पर्याय निवडल्यानंतर फॉर्म डाउनलोड करा आणि ऑनलाइन फॉर्म भरा

यानंतर तुम्हाला पेमेंट करावे लागेल, पेमेंट केल्यानंतर, पावती निश्चितपणे प्रिंट करा.

पैसे भरल्यानंतर, जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्रावर अपॉइंटमेंट बुक करा.

तत्काळ पासपोर्ट फी

passportindia.gov.in नुसार, कोणत्याही व्यक्तीने 36 पानांच्या तत्काळ पासपोर्टसाठी अर्ज केल्यास, 3,500 रुपये शुल्क भरावे लागेल. त्याच वेळी, 60 पानांच्या तत्काळ पासपोर्टची किंमत 4,000 रुपये असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com