
Holi Special : होळीच्या रंगात रंगलेल्या कारला कसं करायचं स्वच्छ? वाचा खास टिप्स
Holi Special : आज रंगपंचमी... अशा परिस्थितीत शाळा, महाविद्यालये, कार्यालयांमध्ये सगळीकडेच रंग उडवले जातात. या काळात जर कोणी तुमच्या गाडीत रंग लावून बसले तर तुमच्या गाडीची अवस्था न बघण्यासारखी होते. याहून बेकार म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीला गाडीत बसण्यास नकारही देऊ शकत नाही. पण आता तुम्हाला त्याबद्दल जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. आता तुम्ही तुमच्या कारच्या सीट आणि आतील भागांवरचे पेंटचे डाग सहज काढू शकता. तुमच्या घरी असलेल्या वस्तूंच्या मदतीने कारची सीट साफ करू शकता.
कारमधील लेदर सीट कशी स्वच्छ करावी?
कारच्या लेदर सीट्स साफ करण्यासाठी तुम्हाला एक साधे काम करावे लागेल. कापडी सीटच्या तुलनेत कारच्या चामड्याच्या सीट स्वच्छ करताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी घरात ठेवलेले नेलपॉलिश रिमूव्हर किंवा रबिंग अल्कोहोल वापरा. अल्कोहोलमध्ये कॉटन बॉल बुडवून तुम्ही सीटचे डाग काढू शकता, यासाठी हळूहळू लेदर सीटवरील सर्व डाग निघून जातील. हे केल्यानंतर, अल्कोहोल, गरम पाणी आणि डिश वॉशने सीट स्वच्छ करा. ही प्रक्रिया फॉलो केल्याने तुमच्या कारच्या सीट्स चमकू लागतील.
कारमधील कापडी सीट कशी स्वच्छ करावी
तुम्हाला कार स्वच्छ करण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. यासाठी तुम्ही क्लब सोडा वापरा. कारच्या सीटवर जिथे डाग पडलेला आहे त्यावर क्लब सोडा हलका स्प्रे करा. यानंतर डाग काढण्यासाठी ब्रश वापरा. असे केल्यावर स्वच्छ टॉवेलने पुसून घ्या.
बेकिंग सोडा : जर तुमच्याकडे क्लब सोडा नसेल तर बेकिंग सोडा सोल्यूशन वापरा. यासाठी एक चतुर्थांश कप बेकिंग सोडा १ कप कोमट पाण्यात मिसळा. यानंतर, या द्रावणाचा हलका थर आणि टूथब्रश वापरून डाग साफ करा. जर डाग खूप खोल असेल तर द्रावण सीटवर सुमारे 30 मिनिटे लावून ठेवा. (Holi)
व्हिनेगर सोल्यूशन : याशिवाय, तुम्ही व्हिनेगर सोल्यूशन वापरून कार सीट देखील स्वच्छ करू शकता. यासाठी 1 बादली घ्या आणि त्यात एक कप व्हिनेगर घाला. यानंतर डिश साबणाचे काही थेंब आणि सुमारे एक गॅलन कोमट पाणी मिसळा. हे द्रावण डागावर हलकेच लावा आणि ब्रश वापरून सीटवरून काढून टाका. (Car)