Mango : आंबा केमिकल्सनी पिकवलेला आहे का, कसं ओळखाल?

विशेषत: आंबा केमिकल्सनी पिकवलेला आहे का? हे जाणून घेणे, सर्वात महत्त्वाचं आहे.
chemically ripened Mango
chemically ripened Mango sakal

Chemically Ripened Mango : सध्या उन्हाळा सुरू झालाय त्यामुळे सगळीकडे आंब्याचं सीजन सुरू झालंय. आंबा हा अनेकांच्या फेवरेट लिस्टमध्ये असतो. सध्या मार्केटमध्ये आंबा असल्याने अनेकजण आंबे खरेदी करताहेत पण आंबा खरेदी करताना आपण काही गोष्टी तपासायला हव्यात.

विशेषत: आंबा केमिकल्सनी पिकवलेला आहे का? हे जाणून घेणे, सर्वात महत्त्वाचं आहे. (How to know a mango is chemically ripened or natural )

मार्केटमध्ये अनेकदा केमिकल्सनी पिकवलेले आंबे असतात आणि आपण अनेकदा आंबे घेण्याच्या उत्साहात असे आंबे घरी आणतो आणि खातो पण याचा दुष्परिणाम आपल्याला आपल्या आरोग्यावर दिसून येतो. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.

chemically ripened Mango
Mango Side Effects : चुकीच्या पद्धतीने आंबा खाणं पडू शकतं महागात; दुष्काळासारखं रक्त आटेल आणि..

कसं ओळखायचं?

  • केमिकल्सनी पिकवलेले आंबे ओळखायचं असेल तर हे आंबे पुर्ण पिवळे किंवा पुर्ण हिरवे नसतात. हे आंबे काही ठिकाणी पिवळे तर काही ठिकाणी हिरवे असतात.

  • नॅचरली पिकवलेल्या आंब्यावर कधीच हिरवे डाग दिसत नाहीत.

  • नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे आतून पिवळे असतात पण केमिकल्सनी पिकवलेले आंबे आतून पिवळे कमी पांढरे जास्त असतात.

  • याशिवाय हे केमिकल्सनी पिकवलेले आंबे खायला तितके गोड नसतात.

  • तर हे केमिकल्सनी पिकवलेले आंबे खाल्यानंतर छातीत जळजळ आणि अॅसिडीटी होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com