
वजन कमी करायचं आहे, ट्राय करा लेमन आइस्ड टी, जाणून घ्या रेसिपी
सकाळी उठून दिवसाची सुरुवात एक कप गरम चहा किंवा कॉफीने पिल्याने दिवस उत्साहाने जातो पण अनेकजण उन्हाळ्यात गरम चहा पिण्यास टाळाटाळ करतात.अशात उन्हाळ्यात एक कप आइस्ड टी पिण्याचा आनंद वेगळाच असतो. दिवसभराच्या थकव्यानंतर संध्याकाळी एक कप लेमन आइस्ड टी प्यायल्याने सर्व थकवा तर दूर होतोच पण डिहायड्रेशनची समस्याही उद्भवत नाही. (How to make lemon iced tea, check here recipe)
लेमन आइस्ड टी रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि याचे सेवन नियमित केल्याने वजन वाढण्याची शक्यता कमी असते. चला तर मग जाणून घेऊया लेमन आईस्ड टीची रेसिपी.
हेही वाचा: पुण्यातील गुळाच्या चहाची काय आहे स्पेशॅलिटी? जाणून घ्या रेसीपी
साहित्य -
पाणी
चहापत्ती
चवीनुसार साखर
लिंबाचा रस
बर्फाचे तुकडे
हेही वाचा: आता 10 मिनीटांत नाश्तासाठी बनवा धिरडे ; जाणून घ्या रेसीपी
प्रक्रिया -
प्रथम एका भांड्यात पाणी गरम करून उकळू द्या.
पाण्याला उकळी आल्यावर गॅस बंद करून त्यात चहाची पाने टाका.
चवीनुसार साखर घालून मिक्स करा.
चहापत्ती ४ ते ५ मिनिटे उकळू द्या.
नंतर त्यात तीन चमचे लिंबाचा रस घाला.
चमच्याने चांगले मिसळा आणि नंतर चाळणीने गाळा.
त्यानंतर चहा थंड होऊ द्या आणि मग फ्रीजमध्ये ठेवा.
सर्व्ह करण्यापूर्वी, चहा एका ग्लासमध्ये घाला आणि त्यात बर्फाचे तुकडे घाला.
तुम्हाला हवे असल्यास वर लिंबाचे तुकडे घालून सर्व्ह करू शकता.
Web Title: How To Make Lemon Iced Tea Check Here Recipe
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..