Breakup मधून कसे बाहेर पडावे? 'या' टिप्स फॉलो कराल तर लगेच Move On व्हाल

नात्यामध्ये जोडीदाराची सवय होते. अशावेळी ब्रेकअप घेतल्यानंतर मुव्ह ऑन करणे सोपी नसतं.
Move on after breakup
Move on after breakupsakal

Move On After Breakup : हल्ली जितक्या लवकर नाते दृढ होतात तितक्याच लवकर नात्यामध्येही दुरावाही येतो. यामुळे अनेकदा ब्रेकअप किंवा घटस्फोट घेण्याचीही वेळ येते. नात्यामध्ये जोडीदाराची सवय होते. अशावेळी ब्रेकअप घेतल्यानंतर मुव्ह ऑन करणे सोपी नसतं.

आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही सहज मुव्ह ऑन करू शकता आणि ब्रेकअपमधून बाहेर पडू शकता. (how to Move on after breakup try these tips)

ब्रेकअप म्हणजे तुमची तुमच्या मनाशी असलेली एक प्रकारची लढाई असते. अशावेळी तुमचं मन अशांत असत. जुन्या आठवणी आठवतात. परत त्याच व्यक्तीकडे जावं असं वाटत. कितीही विश्वासघात किंवा धोका झाला असेल तरी त्या व्यक्तीची ओढ असणे, हे आणखी क्लेषदायक असतं.

१. अशा वेळी सॅड/ब्रेकअप सॉंग्स अजिबात ऐकू नका.

२. सोशल मीडियावरुन ' त्या ' व्यक्तीला ब्लॉक करा.

३. फोन मधून सगळ्या आठवणी पुसून टाका.

४. बाहेर मित्रांसोबत लॉंग टूरवर फिरायला जा.

Move on after breakup
Teenage Love : पालकांनो, मुलं लहान वयात प्रेमात पडताहेत? हे वाचाच

५. मनाविरुद्ध ब्रेकअप झाला असेल तर मग समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आदर ठेवा.

६. कोणत्यातरी विषयात किंवा आवडत्या छंदात आपले मन गुंतवा. वाचन करा, फिरायला जा किंवा चित्रपट पहा.

७. ब्रेकअप झाल्या नंतर दुसऱ्या व्यक्तीशी पूर्णपणे संबंध तुटावा म्हणून जितके वेगळ्या जागी, वेगळ्या लोकांमध्ये वावरा.

८. शक्य असेल तिथे नोकरी बदला, राहण्याची जागा बदला, शहर बदला.

९. ब्रेकअपला सकारात्मक दृष्टीने बघा. दोघांसाठी चांगला निर्णय असल्याचे स्वत:ला समजवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com