Mint Leaves: पुदिन्याची पानं 'असे' करा स्टोअर; येणार नाही दुर्गंधी

Mint Leaves: तुम्ही घरीच पुदिन्याची पानं जास्त दिवसांसाठी स्टोअर करून ठेऊ शकता.
Mint Leaves
Mint LeavesSakal

how to store mint leaves long life

पुदिन्याची पानं खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. तसेच याचा वापर फेसपॅकमध्ये देखील केला जातो. यामुळे त्वचेला थंडावा मिळतो. तसेच चेहरा फ्रेश दिसतो. उन्हाळ्यात चटणी, स्मूदी, सरबत मॉकटेल यासारख्या अनेक पदार्थांमध्ये याचा वापर केला जातो. पुदिन्याचा सुगंध आणि चव पदार्थांची चव वाढवते.

अनेक पदार्थांध्ये या पानांचा वापर होत असल्याने अनेक लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. पण एक दोन दिवसांमध्ये पानं कुजायला लागतात आणि मग फेकून द्यावे लागते. पुदिन्याची पाने जास्त दिवस फ्रेश ठेवायची असेल तर तुम्ही पुढील सोप्या टिप्स फॉलो करू शकता.

  • पानांची देठ तोडावी

बाजारातून पुदिना खरेदी केल्यानंतर किंवा तोडल्यानंतर देठापासून वेगळे करावे. नंतर एका बॉक्समध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवावे. यामुळे जास्त दिवसांसाठी पुदिना स्टोअर करू शकता. या पद्धतीचा वापर करून तुम्ही मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता जास्त दिवस फ्रेश राहतात.

  • पेपर टॉवेलचा वापर

पुदीना जास्त दिवस फ्रेश ठेवण्यासाठी पेपर टॉवेलचा वापर करू शकता. यासाठी पेपर टॉवेल हलके ओले करा आणि त्यात पुदिन्याची पाने देठापासून वेगळी करून ठेवावी. नंतर हा टॉवेल प्लास्टिकच्या पिशवीत ठेवा आणि फ्रिजमध्ये ठेवावी.

Mint Leaves
Soya Poha Recipe: सकाळी नाश्त्यात घरीच बनवा हेल्दी अन् स्वादिष्ट सोयापोहे, जाणून घ्या रेसिपी
  • पाण्याचा वापर

पुदिन्याची पाने जास्त दिवस फ्रेश ठेवण्यासाठी हा सोपा उपाय करू शकता. यासाठी एका जारमध्ये पाणी भरावे आणि त्यात बाजारातून खरेदी केलेला पुदिना ठेवावा. ही पाने ओल्या कपड्याने झाकून फ्रिजमध्ये ठेवा.

  • या गोष्टी ठेवा लक्षात

पुदिन्याची पाने उन्हात सुकवू नका. कारण यामुळे पुदिना खराब होतो आणि त्याचा सुगंधही राहत नाही. ते नेहमी थंड ठिकाणी पुदिना पानं ठेवावी. पुदिन्याची पानं पाण्याने धुऊन फ्रिजमध्ये ठेऊ नका. कारण यामुळे पाने लवकर सडतात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com