Motorbike चालवताना ही घ्या काळजी, छोटी चुकही जीवावर बेतू शकते.

चार चाकीच्या तुलनेत दुचाकीच्या छोट्याच्या दुर्घटनेतही जास्त इजा किंवा दुखापत होण्याचा धोका अधिक असते. यासाठीच बाईक, स्कूटी किंवा कोणतीही दुचाकी चालवत असताना काही गोष्टींची आवर्जुन काळजी घेणं गरजेचं आहे
बाईक चालवताना घ्या काळजी
बाईक चालवताना घ्या काळजीEsakal

दररोज ऑफिसला Office जाण्यासाठी तसचं बाजारातून वस्तू आणण्यासाठी, मुलांना शाळेत सोडण्यासाठी आणि काही वेळस मित्र मैत्रिणींसोबत एखाद्या हिल स्टेशनला Hill Station जाण्यासाठी वेगवेगळ्या कारणांसाठी अनेक लोक बाईकचा Bilke वापर करतात. How To Take Care While Riding Motorbike specially in monsoon

खास करुन कोरोना काळामध्ये बाईकस्वारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.ट्राफिकमध्ये तासनतास घालवावे लागू नये तसंच सोयीस्कर पर्याय म्हणून अनेकजण छोट्या मोठ्या कामांसाठी बाईकचा Bike वापर करतात. बाईक किंवा कोणतीही दुचाकी Two Wheeler हा अनेक कामांसाठी सोयीचा पर्याय असला तरी तो तितकाच जोखमीचा Risk ठरू शकतो.

दुचाकीवरून पडण्याची किंवा दुचाकीचा अपघात होण्याची शक्यता जास्त असते. एवढचं नव्हे चार चाकीच्या तुलनेत दुचाकीच्या छोट्याच्या दुर्घटनेतही जास्त इजा किंवा दुखापत होण्याचा धोका अधिक असते. यासाठीच बाईक, स्कूटी किंवा कोणतीही दुचाकी चालवत असताना काही गोष्टींची आवर्जुन काळजी घेणं गरजेचं आहे.

हेल्मेट- दुचाकी चालवत असताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हेल्मेटचा Helmet वापर. तुम्ही अवघ्या २ मिनिटांच्या अंतरावर जाणार असाल किंवा लाँग ड्राईव्हला, हेल्मेटचा वापर करणं अत्यंत गरजेंचं आहे. केवळ पोलिसांचा धाक किंवा दंड वाचावा म्हणून नव्हे तर स्वत:च्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करणं गरजेंचं आहे.

दुचाकीच्या अपघातात चालकाच्या मृत्यूसाठी हेल्मेट नसणं हे मोठं कारण असल्याचं आजवर अनेकदा समोर आलं आहे. यासाठीच चांगल्या दर्जाचं हेल्मेट खरेदी करणं अत्यंत गरजेचं आहे.

याशिवाय हेल्मेट खरेदी करत असताना ते सुरक्षेच्या नियमांच्या दृष्टीने परिपूर्ण आहे का हे पडताळून मगच खरेदी करा. तसचं दर पाच वर्षांनी हेल्मेट बदलणं गरजेचं आहे. याशिवाय तुमचं हेल्मेट जमिनीवर आदळल्यास किंवा त्याला तडे गेले असल्यास ते त्वरित बदला.

हे देखिल वाचा-

बाईक चालवताना घ्या काळजी
Royal Enfield Electric Bike : लवकरच येणार 'इलेक्ट्रिक बुलेट'; रॉयल एनफिल्डच्या सीईओंनी दिली महत्त्वाची माहिती

लाईटस्- बाईक किंवा दुचाकी चालवत असताना कायम फ्रंट आणि बॅक लाईट सुरू ठेवा. खास करून पहाटे आणि संध्याकाळच्या वेळी या लाईट सुरु ठेऊन ड्राइव्ह करा. या लाईट्स केवळ तुम्हाला रस्ता दिसावा म्हणून नसून इतरांसाठी असतात. या लाईट्समुळे पुढील आणि मागील गाड्यांना सिग्नल मिळेल. तसचं जर तुम्ही हिवाळ्यात किंवा धुकं असलेल्या ठिकाणी प्रवास करणार असाल तर जास्त पाॅवर असलेल्या लाईट्स असणं गरजेचं आहे.

तसंच जोरात पाऊस कोसळत असताना पुढील आणि मागील ब्लिंक लाईट सुरू ठेवल्यास दुर्घटना घडणार नाही.

दोन्ही ब्रेकचा योग्य वापर- बाईक चालवत असताना ब्रेक लावताना दोन्ही ब्रेकचा वापर करणं गरजेचं आहे. यामुळे बाईक स्किड होत नाही. यासाठी तुम्ही दोन्ही ब्रेक वापरण्याची सवय लावा.

हे देखिल वाचा-

बाईक चालवताना घ्या काळजी
Bike Evolution: डिझेलवर डुरडुरणाऱ्या फटफटी आता इलेक्ट्रिक झाल्या! असा होता भारतात बाईक्सचा प्रवास

स्पीडवर लक्ष देणं गरजेचं- बाईक चालवत असताना बाईकच्या स्पीडवर नियंत्रण असणं अत्यंत गरजेचं आहे. अनेकदा उत्साहाच्या भरात किंवा रस्ता चांगला तसचं मोकळा असल्यास अनेकजण बाईक ओव्हरस्पीड करतात. यामुळे अपघाताची शक्यता वाढते. यासाठीच नियमांनुसार आणि रस्ता पाहून बाईक योग्य स्पीडने चालवा.

सिग्नल द्या- लेन बदलताना किंवा डावीकडे अथवा उजवीकडे रस्ता बदलत असतना अनेक बाईकस्वार सिग्नल न देण्याचा निष्काळजीपणा करतात. हे नियम केवळ चारचाकी चालकांसाठी आहेत, असा अनेकांचा समज असतो.

यासाठी बाईक चालवताना अचानक दिशा बदलू नका. त्यापूर्वी योग्य इंडिकेटर द्या. तसचं रस्त्यामध्ये सिग्नल न देता अचानक थांबू नका.

ओव्हरटेक करणं टाळा - कितीही घाई असली तरी इतर गाड्यांना खास करून अवजड वाहनांना ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रत्न करू नका. पुढील वळणाची किंवा वाहनाची कल्पना नसल्याने दुर्घटना घडू शकते.

टायरमधील हवा तपासा - बाईक चालवत असताना दोन्ही टायरमध्ये योग्य प्रमाणात हवा असणं गरजेचं आहे. टायरमध्ये कमी हवा असल्यास कमी प्रेशरमुळे बाईकच्या परफॉर्मन्सवर त्याचा परिणाम होवू शकतो. तसचं मायलेजवरही फरक पडतो.

खराब हवामानात घ्या काळजी - वातावरण खराब असताना बाईक चालवणं टाळा. जोरदार पाऊस कोसळत असताना रस्ते निसरडे होतात आणि अपघात होण्याची शक्यता वाढते त्यामुळे पाऊस पडत असताना बाईक चालवणं टाळा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com