जागतिक भ्रष्टाचार विरोधी दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

९ डिसेंबर रोजी जागतिक भ्रष्टाचार विरोधी दिन साजरा केला जातो.
Anti Corruption Day
Anti Corruption Day esakal

भ्रष्टाचाराविषयी (Corruption) जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि या समस्येशी (problem) लढण्यासाठी योग्य मार्ग मिळावा म्हणून ९ डिसेंबर रोजी जागतिक भ्रष्टाचार विरोधी दिन ( International Anti Corruption Day) साजरा केला जातो. समाजाच्या प्रत्येक घटकातील व्यक्ती, गैर सरकारी संस्था , कायद्याची अंमलबजावणी करणारे आणि प्रसारमाध्यमे यांची भूमिका अधोरेखित करण्याचा हा दिवस आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या म्हणण्यानुसार भ्रष्टाचार ही जागतिक समस्या बनली आहे. यात सर्वच देश भरडले गेले आहेत. एका अहवालानुसार भ्रष्टाचाराची जागतिक किंमत जगातील देशांतर्गत उत्पादनाच्या पाच टक्के किंवा $2.6 ट्रिलियन आहे. भ्रष्टाचार रोखणे समाजासाठी आवश्यक आहे कारण लोकांना आरोग्यसेवा आणि इतर आत्यावश्यक सेवांमध्ये लोकशाहीचा भक्कम आधार आणि मदत मिळते. आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन हा शाश्वत विकास साधायचा असेल तर त्यासाठी भ्रष्टाचार अडथळा आणतो, यावर वस्तुस्थितीवर प्रकाश टाकतो.

UN ने भ्रष्टाचाराविरोधात ग्लोबल टास्क फोर्स स्थापन केला आहे, जो संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP), UN Office on Drugs and Crime (UNODC) आणि UN डिपार्टमेंट ऑफ पॉलिटिकल अँड पीसबिल्डिंग अफेअर्स (DPPA) सहाय्याने राबविला आहे. टास्क फोर्स भ्रष्टाचाराचा मुकाबला करण्यासाठी देशांना पाठिंबा देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या दृष्टिकोनाला बळ देण्याचे काम करते.

Anti Corruption Day
Dhiraj Sahu : तीन डझन मशिन्स मोजतायत पैशांचा ढीग... आतापर्यंत 225 कोटी जप्त; भाजपचे काँग्रेस नेतृत्वावर गंभीर आरोप

असा आहे इतिहास

31 ऑक्टोबर २००३ रोजी भ्रष्टाचाराविरूद्ध संयुक्त राष्ट्रसंघाचा करार युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने स्विकारला. तो २००५ साली अमलात आला. त्यावेळी झालेल्या भ्रष्टाचारविरोधातील या अधिवेशनात बहुसंख्य देश सहभागी झाले होते.भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या लोकांना (व्हिसलब्लोअर्सना) पुरेसे संरक्षण दिले जाईल याची खात्री करण्याची जबाबदारी अधिवेशन सरकारांवर टाकते. 2003 मध्ये, UNGA ने भ्रष्टाचाराविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी, UN कन्व्हेन्शन भ्रष्टाचाराचा कसा मुकाबला करते यासाठी 9 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com