तिकीट बुकींगसाठी असा करा 'IRCTC ई-वॉलेट'चा वापर | IRCTC E-WALLET for easy ticket booking | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IRCTC E-Wallet News

तिकीट बुकींगसाठी असा करा 'IRCTC ई-वॉलेट'चा वापर

मुंबई : दिल्लीमध्ये करोनाची स्थिती गंभीर होत असताना पुन्हा एकदा लोक आपल्या घरी परतू लागले आहेत. यासाठी रेल्वेची तिकीट काढायची असेल तर दलालाला अधिकचे पैसे द्यावे लागतात किंवा तिकीट खिडकीवर लांबलचक रांगेत उभे राहावे लागते. पण तुम्हाला माहीत आहे का, इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ई-वॉलेटद्वारे प्रवाशांना आधीच IRCTCकडे आपले पैसे जमा करून ठेवता येतात. तिकीट बुक करताना केवळ दोन-तीन क्लिकमध्ये सहज रक्कम जमा करता येते. (IRCTC E-Wallet for Eeasy Ticket Booking)

हेही वाचा: भारतीय रेल्वे आणतेय 'आयआरसीटीसी'चा आयपीओ

IRCTC ई-वॉलेट म्हणजे काय ?

ई-वॉलेट हे एक इलेक्ट्रॉनिक कार्ड असून त्याचा वापर संगणक किंवा स्मार्टफोनद्वारे करता येतो. पेमेंट करण्यासाठी ई-वॉलेट ग्राहकाच्या बँक खात्याशी जोडलेले असणे आवश्यक आहे. यामुळे विनाअडथळा पेमेंट करणे शक्य होते.

हेही वाचा: कोरोनाच्या उद्रेकातही सहलीचा "आयआरसीटीसी'चा हेका कायम!

IRCTC ई-वॉलेटमध्ये नोंदणी कशी करावी ?

१. आधी युजर आयडी आण पासवर्डद्वारे ई-वॉलेटमध्ये लॉग इन करावे.

२. Plan My Journey पेजवर आयआरसीटीसी ई-वॉलेटमध्ये जावे.

३. 'IRCTC ई-वॉलेट' रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करावे.

४. व्हेरिफिकेशनसाठी आधार आणि पॅन कार्ड वगैरे माहिती भरावी.

५. नोंदणी शुल्क म्हणून एकदाच ५० रुपये भरावेत.

६. ई-वॉलेटमध्ये कमीत कमी १०० रुपये भरावे लागतील. तुम्ही जेव्हा पेमेंट कराल तेव्हा इतर बँक खात्यांसोबतच ई-वॉलेटचाही पर्याय दाखवला जाईल.

७. त्यानंतर 'गो' बटणावर क्लिक करावे.

ई-वॉलेटमध्ये पैसे कसे जमा करावेत ?

१. आयआरसीटीसी ई-वॉलेट खात्यात लॉग इन करावे.

२. त्यानंतर डिपॉजिट 'IRCTC ई-वॉलेट'वर क्लिक करावे.

३. तुम्हाला आवश्यकता असेल तेवढी रक्कम तेथे लिहा.

४. पेमेंटचा पर्याय निवडा.

५. IRCTC ई-वॉलेटमध्ये रक्कम जमा होईल.

Web Title: Irctc E Wallet For Easy Ticket Booking

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Railway Administration
go to top