Ex Partner : एक्सशी मैत्री ठेवणे आपल्यासाठी चांगले की वाईट? | Relationship Tips | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ex Partner

Ex Partner : एक्सशी मैत्री ठेवणे आपल्यासाठी चांगले की वाईट?

Ex Partner : आपण एखाद्यावर जीवापाड प्रेम करतो पण कधी कधी एक वेळ अशी येते की आपण नात्यातून ब्रेकअप घेतो किंवा नात्यातून बाहेर पडतो. अशावेळी हा नात्यात घेतलेला हा ब्रेकअप कधी कधी दोन्ही बाजूने समजून घेतला जातो तर कधी कधी एका बाजूनेच घेतला जातो.

अशात त्या एक्सशी मैत्री ठेवणे आपल्यासाठी किंवा आपल्या भविष्यासाठी चांगले असते की वाईट? आज आपण या विषयीच सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. चला तर जाणून घेऊया. (is it right or wrong to be a friend of your ex partner read story )

एक्स पार्टनरशी मैत्री करणे कधी योग्य असते?

  • जर तुमच्या एक्सशी तुमची खूप चांगली मैत्री होती आणि तुम्हाला त्या व्यक्तीवर पुर्णपणे विश्वास आहे. तेव्हा एक्स पार्टनरशी (Ex Partner ) मैत्री ठेवली तरी काहीही गैर नाही.

  • जेव्हा तुमचा ब्रेकअप हा दोघांच्या परस्पर संमतीने झाला असेल तेव्हा नात्यात मैत्री ठेवणे काहीही चुकीचे नाही. अशावेळी दोघेही एकमेकांच्या भावना समजू शकतात.

  • जेव्हा दोघेही मुव्ह ऑन झालेले असतात तेव्हा एक्स पार्टनरशी मैत्री ठेवण्यात काहीही गैर नसते. फक्त तुमची चांगली मैत्री आहे, हे आताच्या तुमच्या पार्टनरला विश्वासात घेऊन सांगणे, कधीही चांगले असते.

एक्स पार्टनरशी मैत्री करणे कधी अयोग्य असतं?

  • तुमच्या एक्स पार्टनरचा स्वभाव तुम्हाला माहिती असतो. त्यामुळे त्याच्याशी आताही मैत्री ठेवणे, कितपत चांगले आहे. याविषयी आपल्याला समज असायला हवी.

  • जर तुमच्या एक्सने तुमची फसवणूक केली असेल तर त्या एक्सशी कधीच मैत्री करू नये.

  • ब्रेकअप घेण्याचा निर्णय हा जर तुमचा असेल आणि आजही तुमचा एक्स पार्टनर तुमच्यावर आजही प्रेम करत असेल मैत्री करताना सावध राहा.