जेवल्यानंतर लगेच झोपताय? 'गर्ड' आजाराचा वाढेल धोका! जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला...

Sleep vs Digestion: पचनसंस्थेचे आरोग्य धोक्यात! जेवल्यानंतर लगेच झोपणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती...
Why Late Dinners Ruin You

Why Late Dinners Ruin You

esakal 

Updated on

Bed After Dinner?: दिवसभराच्या धावपळ आणि थकव्यानंतर रात्री उशिरा जेवणे आणि लगेच बेडवर पडणे ही अनेकांसाठी अगदी सामान्य गोष्ट झाली आहे. पण, नकळतपणे ही सवय तुमच्या पचनसंस्थेला गंभीर इजा पोहोचवत आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जेवल्यानंतर लगेच झोपल्याने 'गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स डिसीज' (GERD) म्हणजेच 'गर्ड' नावाच्या आजाराचा धोका कित्येक पटीने वाढतो. यामध्ये पोटातील अन्न पचवणारे ॲसिड उलट्या दिशेने अन्ननलिकेत (Food pipe) वाहू लागते, ज्यामुळे छातीत असह्य जळजळ आणि दीर्घकालीन आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

जेवल्यानंतर लगेच झोपल्याने ॲसिड रिफ्लक्स का होतो ?

जेव्हा आपण जेवल्यानंतर लगेच आडवे होतो, तेव्हा पचनक्रियेत,गुरुत्वाकर्षण (Gravity) शरीराला मदत करू शकत नाही. परिणामी, पोटातील ॲसिड सहजपणे वरच्या दिशेने अन्ननलिकेत प्रवास करते. यामुळे छातीत जळजळ, अस्वस्थता आणि तोंडात आंबट-कडू चव येणे अशा समस्या सुरू होतात. ज्या लोकांना आधीच 'गर्ड' (GERD) चा त्रास आहे, त्यांची अन्ननलिका आणि पोटाला जोडणारे स्नायू कमकुवत असल्याने हा त्रास अधिक वाढतो. रात्रीच्या वेळी तेलकट, तिखट किंवा जड जेवण करून लगेच झोपल्यास ही लक्षणे जास्त तीव्र होतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com