Winter Fitness Tips : हिवाळ्यात व्यायाम करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत. जे फिटनेसच्या बाबतीत खूप दक्ष असतात. त्यामुळे, त्यांच्या व्यायामाच्या रूटीनवर थंडीचा, पावसाचा किंवा उन्हाचा काहीच फरक पडत नाही.
Winter Fitness
Winter Fitnessesakal

Winter Fitness : सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. थंडीमुळे आरोग्यावर परिणाम होतो आणि अनेक समस्या निर्माण होतात. मात्र, वाढत्या थंडीमुळे अनेक जण आळशी देखील होतात.

परंतु, आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत. जे फिटनेसच्या बाबतीत खूप दक्ष आहेत. त्यामुळे, त्यांच्या व्यायामाच्या रूटीनवर थंडीचा, पावसाचा किंवा उन्हाचा काहीच फरक पडत नाही. ते किती ही थंडी असली तरी सुद्धा व्यायाम करतात.

मात्र, थंडीच्या दिवसांमध्ये धावण्याचा व्यायाम करताना किंवा इतर प्रकारचे व्यायाम करताना काही गोष्टींची काळजी घेणे हे फार महत्वाचे आहे. कोणत्या आहेत त्या गोष्टी? चला तर मग जाणून घेऊयात.

Winter Fitness
Health Care : कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढली आहे हे कसे ओळखाल? जाणून घ्या ‘ही’ प्रमुख लक्षणे

वॉर्मअप आहे महत्वाचा

थंडीच्या दिवसांमध्ये धावण्याचा किंवा कोणत्याही प्रकारचे व्यायाम करण्यापूर्वी तुमचे शरीर त्यासाठी तयार असणे महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही वॉर्मअप करणे महत्वाचे आहे.

थंड वातावरणामध्ये आपल्या शरीरातील स्नायू हे घट्ट होतात. त्यामुळे, शरीरावर ताण येण्याचा किंवा दुखापत संभवण्याचा धोका वाढतो. त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये तुमचे हृदय आणि शरीर सक्रिय ठेवण्यासाठी तुम्ही व्यायाम करण्यापूर्वी वॉर्मअप करणे फार महत्वाचे आहे.

कपड्यांचे लेअरिंग आवश्यक

थंडीच्या दिवसांमध्ये व्यायाम करताना तुम्ही चांगल्या प्रकारचे उबदार कपडे घालणे महत्वाचे आहे. त्यामुळे, कपड्यांचे लेअरिंग करताना ते अशा प्रकारे करा की, जेणेकरून तुमचे शरीर गरम राहू शकेल.

आतून घाम शोषणारे कपडे घालणे महत्वाचे असून त्यावर लेअरिंग करताना तुम्ही वॉटरप्रूफ जॅकेट किंवा जर्किंग घालू शकता. यामुळे, तुम्हाला जास्त थंडी वाजणार नाही आणि व्यायाम करताना तुम्हाला कोणती अडचण येणार नाही.

हायड्रेटेड रहा

बाहेर किती ही थंडी असेल तरी देखील तुम्ही तुमचे शरीर आतून हायड्रेटेड ठेवणे हे फार महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही व्यायाम करताना पाण्याची एक बॉटल सोबत ठेवायला विसरू नका. जर तुम्ही धावण्याचा व्यायाम करणार असाल तर धावण्यापूर्वी १ तास आधी पाणी प्या किंवा धावून आल्यानंतर १ तासानंतर पाणी प्या.

Winter Fitness
Yoga For Heart : हृदय ठेवायचं असेल फिट आणि हेल्दी तर रोज करा ही योगासनं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com