Kitchen Hacks : कांदा कापताना ती नेहमीच ढसाढसा रडते; बायकोलाही द्या या टिप्स | Kitchen Hacks : onion cutting tips without tears how to chops onions without shedding tears | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kitchen Hacks

Kitchen Hacks : कांदा कापताना ती नेहमीच ढसाढसा रडते; बायकोलाही द्या या टिप्स

Kitchen Hacks : आई-वडिलांनी वाढवलं आणि कांद्यानं रडवलं' ही म्हण तुम्हा सगळ्यांना माहीतच असेल. स्वयंपाक घरात शिरायचं म्हटलं की सगळ्यांना रडवणारा कांदा आठवतो. कांदा कापणे आणि त्यामुळे रडणं यामुळे कधी कधी स्वयंपाक करायला ही कंटाळा येतो. 

स्वयंपाक करताना कांद्याला विशेष महत्त्व आहे. कोशिंबीर असो वा भाजी किंवा इतर कोणताही पदार्थ, कांद्याशिवाय चव अपूर्ण वाटते. ज्यामुळे दररोज कांदा कापावा लागतो. पण कांदा कापणे हे लोकांसाठी खूप अवघड काम आहे. कारण कांदा कापताना डोळ्यातून अश्रू वाहू लागतात.

याचे कारण कांद्यामध्ये असलेले एक प्रकारचे एंजाइम आहे, जे कापताना डोळ्यांवर परिणाम करते. अशावेळी काही टिप्स फॉलो करून तुम्ही अश्रू न ढाळता सोप्या पद्धतीने कांदा कापू शकता. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल.

कांदा आपल्याला का रडवतो

कांदा कापला गेला की त्या संयुगांचे रुपांतर अॅसिडमध्ये होते आणि एन्झाइम अॅसिडचे रुपांतर गंधकयुक्त ऑक्साईडमध्ये होते. हे रसायन बाष्पनशील असते त्यामुळे त्याचे रुपांतर वायूत होऊन ते थेट डोळ्यात शिरते. ही प्रक्रिया डोळ्यातील अश्रुंमधील पाण्याशी होते आणि त्याचे रुपांतर सलफ्युरिक अॅसिडमध्ये होते.

हे अॅसिड डोळे चुरचूरण्यास कारणीभूत ठरल्यानंतर डोळ्यातून पाणी येण्यास सुरुवात होती. कांद्याच्या पेशींमध्ये असणार्‍या दोन तेलांपैकी एका तेलामध्ये वासयुक्त आणि डोळ्यांना दाहक, चुरचुरणारे घटक असतात. डोळ्यातून अश्रू आणणारे असे हे रसायन असते. डोळ्यांची जळजळ होऊन पाणी येणे हा काही त्रास नाही आहे

कांदा मुळापासून कापून घ्या

कांदा वरच्या बाजूला कापला की त्याच्या एंझाइम्सचा डोळ्यांवर जास्त परिणाम होतो. ज्यामुळे डोळ्यातून अश्रू वाहू लागतात, कधी कधी डोळ्यात जळजळही होते. त्यामुळे कांदा नेहमी मुळापासून कापून घ्यावा. कांदा मुळापासून कापून एंझाइमचा प्रभाव कमी करता येतो.

लिंबू मदत करेल

कांदा कापताना डोळ्यातून अश्रू येऊ नयेत म्हणून लिंबाची मदत घेऊ शकता. यासाठी कांदा कापण्यापूर्वी चाकूवर थोडा लिंबाचा रस लावावा. यामुळे कांदा कापताना डोळ्यांवर एन्झाइमचा परिणाम होणार नाही, ज्यामुळे अश्रू आणि चिडचिडेपणाची समस्या दूर होईल.

व्हिनेगर वापरा

कांद्यापासून बाहेर पडणार्या एंजाइमचा आपल्या डोळ्यांवर परिणाम होणार नाही याची खात्री करण्यासाठी आपण व्हिनेगर वापरू शकता. यासाठी कांदा कापण्यापूर्वी व्हिनेगरमध्ये बुडवून ठेवावा. यामुळे कांदा कापताना अश्रू येत नाहीत आणि डोळ्यात जळजळ होत नाही.

शिट्टी वाजवणे

कांदा कापताना शिट्टी हाही एक चांगला पर्याय ठरू शकतो. आता तुम्ही विचार करत असाल की कसे, तर जाणून घेऊया कांदा कापताना शिट्टी वाजवल्याने तोंडातून हवा बाहेर पडते. ज्यामुळे कांद्यातून बाहेर पडणारे एंजाइम डोळ्यांच्या जवळ येण्यापासून रोखू शकतात. यामुळे तुमच्या डोळ्यातून अश्रू सुटणार नाहीत.

कांदा फ्रीजरमध्ये ठेवा

कांदा कापण्यापूर्वी थोड्या वेळाने सोलून काही वेळ फ्रीजरमध्ये ठेवावा. यामुळे कांद्यामध्ये असलेल्या एंझाइम्सचा प्रभावही कमी होतो. ज्यामुळे डोळ्यात कांद्याचे भाव येत नाहीत आणि कांदा कापताना डोळ्यातून अश्रू येत नाहीत.

मेनबत्ती

कांदा कापताना तुम्ही दिवा किंवा मेणबत्तीदेखील वापरू शकता. यासाठी कांदा कापताना आपल्या आजूबाजूला दिवा किंवा मेणबत्ती ठेवावी. यामुळे कांद्यातून बाहेर पडणारे एंझाइम उष्णतेकडे वळते आणि त्याचा परिणाम डोळ्यांवर होत नाही आणि अश्रू वाहत नाहीत.