Walk After Food : तरूणांनी जेवल्यानंतर कधी अन् किती वेळ करावी शतपावली? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Walk

Walk After Food : तरूणांनी जेवल्यानंतर कधी अन् किती वेळ करावी शतपावली?

Walk Benefits After Eating Food : सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजारांनी अनेकांना त्रस्त करून सोडलं आहे. आपल्यापैकी अनेकांनी दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर फिरायला जाणाऱ्या व्यक्तींना पाहिले असेल.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

हेही वाचा: Bad habit Of drinking Water After Tea: चहा पिल्यानंतर पाणी पिण्याची सवय आहे? वेळीच सावध व्हा नाहीतर..

तर, दुसरीकडे पोटभर जेवण केल्यानंतर काहींना एकाच ठिकाणी तासंतास बसलेले बघितले असेल. परंतु, रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणानंतर शरीराची हालचाल न करता एकाच ठिकाणी बसून राहिल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळते. आपल्यापैकी अनेकांना जेवल्यानंतर खरंच खाल्लेलं अन्न पचतं का? असा प्रश्न पडतो. या आणि तरूणांपासून ते वृद्धांपर्यंत व्यक्त्तींनी जेवल्यानंतर शतपावली करणं आणि कोणत्यावेळी करणं आवश्यक आहे याबद्दल माहिती सांगणार आहोत.

हेही वाचा: Young Generation : इंटरनेटमुळे तरुण पिढीचा पालकांशी बोलण्यास नकार; वेळीच आवर गरजेचा

रात्रीच्या जेवणानंतर अनेकजण लगेच झोपतात. यामुळे वजन वाढण्याची दाट शक्यता असते. शिवाय अनेक आजारही जडू शकतात. रात्रीचे किंवा दुपारचे जेवण केल्यानंतर काही वेळ शतपावली करणे शरीरासाठी अत्यंत गरजचे आहे. यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

ह्युस्टन मेथोडिस्ट हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. केरशॉ पटेल यांनी सांगितले की, एखादी व्यक्ती करत असलेल्या प्रत्येक छोट्या गोष्टीचा त्याच्या शरिरावर परिणाम होत असतो. जेवण केल्यानंतर शतपावली केल्याने शरीराच्या वाढत्या वजनावर नियंत्रण मिळण्याबरोबच अनेक गंभीर आजारांपासून बचाव होण्यास मदत होते.

हेही वाचा: Blood Type Diet : वेटलॉससाठी प्रत्येकाला वेगळ्या Diet ची का असते गरज? तुमच्याच रक्तात दडलंय उत्तर

जेवल्यानंतर शतपावलीचा खरंच फायदा होतो का?

ज्यावेळी आपण कोणत्याही प्रकारचं अन्न सेवन करतो. त्यावेळी आपलं शरीर अधिक सक्रीय होते. खाल्लेले अन्न पचवण्यासाठी शरीरातील लहान आतडे महत्त्वाची भूमिका बजावत असतात. याबाबत करण्यात आलेल्या संशोधनातूनही जेवल्यानंतर शतपावली केल्याने अन्न पोटातून लहान आतड्यांमध्ये अधिक गतीने जाण्यास मदत होते. तसेच पोट फुगणे, गॅसेस होणे आदींसारख्या समस्यांपासून बचाव होण्यास मदत होते. त्यामुळे जेवण केल्यानंतर साधारण ३० मिनिटे चालण्याने पचनक्रिया सुधारण्यास तसेच बद्धकोष्ठतेची शक्यता कमी होते.

शतपावलीचे एक नव्हे तर अनेक फायदे

जेवल्यानंतर शतपावली केल्याने शरीर क्रियाशील होण्याबरोबरच खाल्लेल्या अन्नाचे पचन चांगल्या पद्धतीने होते. जेवल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या शाररिक हालचालींमुळे शरिरातून एंडोर्फिन किंवा फीलगुड हार्मोन बाहेर पडते, ज्यामुळे शरीराला आराम मिळतो. जेवल्यानंतर चालण्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते, रक्तातील साखरेचे प्रमाण व्यवस्थित राहण्याबरोबरच नैराश्यासारख्या समस्येपासूनही बचाव होण्यास मदत होते.

हेही वाचा: Oil Massage : शरीराला तेलाने मालिश करणे चांगलेच; पण कोणती वेळ योग्य ?

जेवल्यानंतर किती वेळ चालावे?

जेवणानंतर तरूणांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येक व्यक्तीने किमान २० मिनिटे चालणे शरीरासाठी फायदेशीर असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, जर एखाद्या व्यक्तीकडे जास्त वेळ असेल तर, तुम्ही हा कालावधी २० ते ४० मिनिटांपर्यंत वाढवू शकता.