Driving Tips : Car Driving करताना तुम्ही देखील चुकीच्या पद्धतीने क्लच दाबताय का? जाणून घ्या योग्य पद्धत

कार चालवण्यासाठी संयम, एकाग्रतेसोबतच कौशल्य गरजेचं आहे. मात्र अनेकदा काही वर्ष ड्रायव्हिंग करणाऱ्यांना देखील कारच्या क्लचचा योग्य वापर ठाऊक नसतो. अनेक चालक क्लच Use of Clutch वापरताना काही चुका करतात
क्लचचा कसा करावा वापर
क्लचचा कसा करावा वापरEsakal

कार चालवणं हे कारी रॉकेट सायंन्स नव्हे. मात्र कार चालवताना झालेली एक छोटीशी चुक तुमच्या किंवा इतर कुणाच्या जीवावर बेतू शकते. यासाठीच कार चालवताना खबरदारी बाळगणं अत्यंत गरजेचं आहे.( Know what care should be taken while driving the car)

अनेकदा ड्रायव्हिंग Driving करत असताना आपल्याकडून नकळत तर काहीवेळा चालकाच्या निष्काळजीपणामुळे काही चुका होत असतात. या चुकांमुळे जीव धोक्यात येऊ शकतो. तसचं यामुळे गाडीमध्ये Car देखील बिघाड होण्याची शक्यता असते.

काहीवेळेस गाडी ओव्हरस्पीड होते तर काही वेळेस ब्रेक Break किंवा क्लच दाबण्यात झालेल्या चुकांमध्ये एखादी दुर्घटना घडू शकते. तसंच कारमध्ये यामुळे तांत्रिक बिघाड निर्माण होवू शकतो.

कार चालवण्यासाठी संयम, एकाग्रतेसोबतच कौशल्य गरजेचं आहे. मात्र अनेकदा काही वर्ष ड्रायव्हिंग करणाऱ्यांना देखील कारच्या क्लचचा योग्य वापर ठाऊक नसतो. अनेक चालक क्लच Use of Clutch वापरताना काही चुका करतात. सामान्यत: अनेकांकडून क्लच दाबताना होणाऱ्या पाच चुकांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या चुका टाळून तुम्ही क्लचचा योग्य वापर करू शकता.

१. क्लच सोडण्याची घाई- ट्रॅफिकमध्ये कार चालवत असताना अनेकांकडून ही चूक नकळतपणे होत असते. जर ट्रॅफिकमध्ये किंवा गाडी सतत थांबून चालत असेल तर तर झटका देऊन क्लच सारखा सोडू नका. गाडी सिग्नलला थांबलेली असताना झटका देऊन क्लच सोडून रेज देऊ नका यामुळे कार बंद होऊ शकते.

सिग्नलला अशा बंद पडणाऱ्या गाड्या तुम्ही पाहिल्या असतीलही. तसचं सतत झटका देऊन क्लच सोडल्याने क्लच प्लेट लवकर खराब होऊ शकतात. तसचं इंजिनवरही याचा परिणाम होतो.

हे देखिल वाचा-

क्लचचा कसा करावा वापर
Car Driving Tips : A एक्सीलेटर, B ब्रेक, C क्लच, D कशासाठी? कारची ABCD शिकून घ्या

२. गियर बदलताना अर्धवट क्लच दाबणं- अनेकजण ही एक मोठी चुक करतात. गियर बदलत असताना अर्धवट क्लच दाबल्यास गियर योग्य पद्धतीने डिसएन्गेज होत नाही. तसचं यामुळे गियरबॉक्समधून आवाज येऊ लागतो.

जर तुम्ही सतत ही चुक करत असाल तर यामुळे गियरबॉक्समध्ये बिघाड होवू शकतो. यासाठी गियर बदलत असताना क्लच पूर्णपणे दाबावा.

३. क्लच पूर्णपणे न सोडणं- काही लोक कायम क्लचवर एक पाय ठेवूनच कार चालवतात. अचानक ब्रेक दाबावा लागेल किंवा गियर बदलावा लागेल या विचाराने सतत क्लचवर पाय ठेवला जातो. यामुळे क्लचवर भार पडून तो सतत हलका दाबलेला राहतो.

यामुळे क्लच आणि गियरबॉक्स दोन्हीचं नुकसान होऊ शकतं. तसचं यामुळे क्लचप्लेट घासल्या जातात आणि कारचा पिकअप कमी होऊ शकतो.

४. सतत क्लच दाबणं- काही लोकांना ड्रायव्हिंग करत असताना विनाकारण सतत क्लच दाबण्याची सवय असते. यामुळे कारला झटका लागतो. यामुळे कारमधील प्रवाशांचा प्रवास खराब तर होतोच शिवाय यामुळे गियरबॉक्सच सगळ्यात जास्त नुकसान होतं. तसचं यामुळे कारचं मायलेजही कमी होऊ शकतं.

५. स्पीड कमी करण्यासाठी क्लचचा वापर- स्पीड कमी करण्यासाठी वेळोवेळी क्लच दाबण्याची आवश्यकता नसते. जर तुम्हाला कार पूर्णपणे थांबवायची असेल तरच क्लचचा वापर करा. जर तुम्हाला कारची केवळ स्पीड कमी करायची असेल तर तुम्ही क्लचएवजी ब्रेक दाबू शकता.

हे देखिल वाचा-

क्लचचा कसा करावा वापर
Light Foot Driving नेमकं आहे तरी काय? यामुळे कार देईल जबरदस्त मायलेज

क्लचचा असा करा योग्य वापर

रस्ता मोकळा असल्यास क्लचा वापर विनाकारण करू नका केवळ गियर बदलण्यासाठी पूर्ण क्लच दाबा.

गियर बदलून झाल्यास क्लचवरून पाय काढून टाका.

गाडी काही काळासाठी थांबवायची असल्यास क्लच दाबून गाडी न्युट्रल करा आणि हळूहळू क्लच सोडून द्या.

गाडी चालवत असताना य़ा काही सामान्य गोष्टींकडे लक्ष दिल्यास गाडीमध्ये तांत्रिक बिघाड होणार नाहीत.शिवाय कारला चांगले मायलेजही मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com