Lemon Premix : पाहुणे आल्यावर लिंबू शोधायला जाऊ नका; असं बनवा लिंबू प्रिमिक्स, सरबत होईल मिनिटात तयार

हे प्रिमिक्स तुम्ही वर्षभर साठवून ठेऊ शकता
Lemon Premix
Lemon Premixesakal

Lemon Premix :

उन्हाळ्याच्या झळा जशा जाणवत आहेत. तसे लिंबू अन् सरबतांची मागणी वाढत आहे. ज्यूस पिणं सगळ्यांनाच परवडणार नसतं. त्यामुळे थंडगार करणार लिंबू सरबत सगळेच आवडीने पितात. उन्हाळ्यात पाहुणे घरी आल्यावर लिंबू सरबतच कर असे सांगितले जाते.

पण, उन्हाळ्यात लिंबू महाग होतात. आणि कधी कधी ते घरात शिल्लकही नसतात. त्यामुळेच पाहुणे घरात येण्याआधीच लिंबू आणून ठेवावा लागतो. अन् अचानक पाहुणे घरात आले तर मात्र गोंधळ होतो. अशावेळीच लिंबू सरबताचं बाजारात मिळतं तसं प्रिमिक्स घरीच बनवता येतं. जे तुमच्या फायद्याचं ठरणार आहे.

हे लिंबू सरबताचं प्रिमिक्स कसं बनवायचं, त्याची साठवणूक कशी करायची, आणि यापासून लिंबू सरबत कसा बनवायचा हे आपण पाहुयात. (Lemon)

Lemon Premix
उन्हाळ्यात शीतपेयांऐवजी प्या लिंबू पाणी, आरोग्य राहील निरोगी

साहीत्य

१५ लिंबू, साखर आणि मीठ (Recipe)

कृती

  • बाजारातून जास्त रस असलेली पिकलेले लिंबू घेऊन या.त्यानंतर लिंबूवर दाब देऊन ती मऊ करून घ्या

  • आता ती आडवी मधोमध कापून घ्या आणि लिंबाचा रस काढून घ्या

  • आता एका मोठ्या ताटात हा लिंबाचा रस ओतून घ्या

  • आता यामध्ये जितका रस असेल तर त्याच्या तिप्पट साखर घाला

  • आता साखर आणि लिंबू हलक्या हातांनी मिसळून घ्या

  • आता हे ताट घरातच सुकवून घ्या याला उन्हात सुकवू नका

  • १० ते १२ तासांनी हे ताटातलं मिश्रण हलवून घ्या (Lemon Primix Recipe)

  • दर सात ते आठ तासांनी हलवत रहा. चार दिवसांनी हे पुर्णपणे सुकवून घेणे

  • चार दिवसांनंतर तयार मिश्रणात मीठ घालावे आणि मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्या. 

Lemon Premix
Health Care News: तुम्हीही ब्लॅक टीमध्ये लिंबू टाकून पिता का? किडनीचं होऊ शकतं मोठं नुकसान

यापासून सरबत कसा करावा

एका ग्लासमध्ये लिंबूचे प्रिमिक्स घाला आणि त्यामध्ये तुम्हाला हवे तितक थंड पाणी घाला आणि तुमचा सरबत तयार होईल. तसेच तुम्हाला यामध्ये साखर कमी वाटत असेल तर तीही तुम्ही त्यामध्ये घालू शकता.  

Lemon Premix
Tips For Black Magic: घरावर कोणी लिंबू फिरवलाय का? वास्तू देत असलेले हे संकेत वेळीच ओळखा!

साठवणूक कशी करावी

तुम्ही हे प्रिमिक्स वर्षभर ठेऊ शकता. फक्त एक काळजी घ्या की, ते काचेच्या हवा बंद डब्यात ठेवा. हवा लागली की साखर विरघळते त्यामुळे प्रिमिक्स चिकट होऊ शकते. त्यामुळेच ही काळजी घ्या.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com