आमदारांच्या हस्ते घेतले लिंबू सरबत अन्...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 18 August 2020

ग्राहक पंचायतीचे प्रांत संघटनमंत्री बाळासाहेब औटी यांचे बेमुदत उपोषण मागे.
 

आळेफाटा : राजुरी (ता. जुन्नर) येथे सोमवार (ता. १७) पासून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने ग्राहक पंचायतीचे प्रांत संघटनमंत्री बाळासाहेब औटी यांनी, बिबट्याप्रवण क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या विजेच्या समस्यांसह विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सुरु केलेले बेमुदत उपोषण जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी मंत्रीस्तरावर यासंदर्भात बैठक घेण्याचे निश्चित करून शासनाशी याबाबत यशस्वी मध्यस्थी केल्याने त्यांच्या हस्ते लिंबूरस घेऊन मागे घेतले.

राजुरी येथे मुक्ताबाईच्या माळावर ग्राहक पंचायतीचे प्रांत संघटनमंत्री बाळासाहेब औटी यांनी सोमवार (ता. १७) पासून बिबट्याप्रवण क्षेत्रात राहुटी लावून आंदोलन सुरू केले होते. राज्यस्तरावर बिबट्याप्रवण क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या काही महत्वाच्या मुद्यांची सोडवणूूक व्हावी यासाठी आंदोलन सुरु करण्यात आले होते. याठिकाणी आज (ता.१८) सकाळी जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी प्रत्यक्ष भेट देऊन बाळासाहेब औटी यांच्याशी त्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा केली.

छोट्या आकाराचा सुखकर्ता ठरले मोठ्या आकाराचा विघ्नहर्ता

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जा मंत्री नितीन राऊत व उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासोबत बैठक घेण्याचे निश्चित करून, तशा आशयाचे उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे पत्र ग्राहक पंचायतीचे बाळासाहेब औटी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.

तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या विनंतीला मान देऊन, ग्राहक पंचायतीचे प्रांत संघटनमंत्री बाळासाहेब औटी यांनी आंदोलन तूर्त स्थगित करत असल्याचे स्पष्ट केले.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, पंचायत समिती सदस्या अनघा घोडके, जुन्नरचे तहसिलदार हनुमंत कोळेकर, राजुरीचे सरपंच एम. डी. घंगाळे, विज वितरण कंपनीचे श्री. नारखडे, पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, वनविभागाचे अधिकारी, ग्राहक पंचायतीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोर, तालुका अध्यक्ष जगन्नाथ खोकराळे तसेच अशोक घोडके, जयसिंग औटी, विजय कुऱ्हाडे, राजुरी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

खडकवासला धरणातून पुन्हा विसर्ग वाढवला

दरम्यान, ग्रामपंचायतींच्या स्ट्रीट लाईट विनाअट बसवा, कृषीपंपांना दिवसा बारा तास वीजपुरवठा करा, प्रलंबित विजकनेक्शन त्वरित द्या, वीज ग्राहकांना वीज बीलात सवलत मिळावी, आणे विद्युत उपकेंद्राचे वीजवाहीनीचे अपूर्ण काम तातडीने पुर्ण करावे आदी मागण्यांबाबत धोरणात्मक बाबींवर मंत्री पातळीवर चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येणार आहे. यावेळी आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते लिंबूरस घेऊन, ग्राहक पंचायतीचे बाळासाहेब औटी यांनी बेमुदत उपोषण मागे घेतल्याचे सांगण्यात आले.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Balasaheb Auti called off the fast