
LGBTQ : ‘रेनबो लव’! तृतीयपंथीयांना संसार थाटणं होणार सोपं; मिळणार मनासारखा जोडीदार
LGBTQ Matrimony App : प्रत्येक भारतीयाला आपला जोडिदार निवडायचे स्वातंत्र्य आहे. जोडिदार विश्वासू आणि प्रामाणीक असणे हा प्रत्येकाचा हक्कही आहे. पण तृतीयपंथी समाजाला मात्र यापासून वंचित राहण्याची वेळ आजवर आली होती. मात्र आता त्यांची ही वंचना आता दूर होणार आहे. मॅट्रिमोनी डॉटकॉमने एलजीबीटीक्यू समुदायासाठी आज रेनबो लव ॲपचे उद्धघाटन केले. प्रत्येक भारतीयाला जोडीदार मिळावा, याउद्देशने रेनबो लव ॲपची निर्मिती केली आहे.
या ॲपची निर्मिती करण्यासाठी साधारण दीड वर्षाचा अभ्यास, प्रत्यक्ष तृतीयपंथियांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न जाणून घेणायत आला. या अभ्यासाविषयी मॅट्रिमोनी डॉटकॉमचे मुख्य विपणन अधिकारी अर्जुन भाटिया यांनी सकाळशी बोलताना सांगितले, आजवर गे मॅट्रिमोनी ॲप, लेसबमयन मॅट्रिमोनी ॲप, ट्रांस जेंडर मॅट्रिमोनी ॲप असे वेगवेगळे ॲप आहेत. पण या सर्वांना सामावून घेणारे हे पहिलेच आणि विश्वासार्ह ॲप आहे. ज्यांना खरोखर लग्न करायचे आहे, जीवनसाथी हवा आहे केवळ त्यांच्यासाठी हे ॲप असल्याच त्यांनी अधोरेखित केले. त्यासाठी यात अनेक सिक्यूरिटी फिचर्स देण्यात आले आहेत.
ॲपची खासियत
एलजीबीटीक्यू समुदायाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन दूषित असल्याने यांच्यात फसवणूकीचे, शोषणाचे प्रमाण खूप आहे. या ॲपची विश्वासार्हता रहावी आणि त्यांना योग्या जोडिदार मिळावा म्हणून काही नियम करण्यात आले आहेत.
यावर केवळ सिरीयस रिलेशनशीप हवे असणारेच रजिस्ट्रेशन करू शकतात.
रजिस्ट्रेशनसाठी आधार कार्ड, पासपोर्ट, पासबूक अशा शासकीय पुरावे गरजेचे आहे.
फेक प्रोफाईल टाळण्यासाठी सेल्फी व्हेरीफिकेशन हे युनिक फिचर आहे.
हा सेल्फी अपलोड होणाऱ्या प्रोफाईल फोटोशी मॅच झाला तरच स्वीकारला जाईल.
या ॲपवरच्या पेड, अनपेड मेंमबर कोणालाही आवडलेल्या प्रोफाईल मेंमबरचा फोन नंबर मिळणार नाही. व्हिडीओ कॉल करता येणार नाही.
आपापल्या प्रोफाईलचे फोटा हाईड कंट्रोल प्रत्येक सदस्याकडे असेल.