Lip Shape: तुमचे ओठच सांगतात तुमचे सिक्रेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lip Shape

Lip Shape: तुमचे ओठच सांगतात तुमचे सिक्रेट

Lip Shape : प्रत्येकाच्या शरीराची ठेवण वेगळी असते. शरीरातील अनेक अवयव तुमच्या व्यक्तीमत्त्वाविषयी खूप काही सांगून जातात. विश्वास बसणार नाही, पण हे खरंय. ओठांची ठेवण, आकारही एखाद्याच्या मनात नेमकं काय सुरुये याविषयी लगेचच सांगून जातात

फूल लिप

ज्यांचे ओठ पूर्णाकार (मोठे) असतात त्यांचं मन मोठं असतं. इतरांप्रती त्यांच्या मनात सहानुभूती असते. ही मंडळी नाती निभावण्यासाठी ओळखली जातात. पण, अनेकदा विचार न करता काहीही बोलणं त्यांना अडचणीत आणतं.

लोवर फूल लिप

ज्यांच्या ओठांचा खालचा भाग पूर्ण (मोठा) असतो ते आयुष्याचा आनंद मनमुराद लुटतात. ही माणसं करिअरमध्ये प्रचंड प्रगती करतात. त्यांना नव्या गोष्टींबाबत शिकायला आवडतं.

फूल अप्पर लिप

ओठांचा वरील आकार मोठा असणाऱ्यांना इतरांच्या मनात जागा बनवायला फारसा वेळ लागत नाही. विनोदबुद्धीनं ही मंडळी आजुबाजूच्यांना सतत आनंद देत असतात.

थीन लिप

ओठांचा आकार लहान असल्यास ही मंडळी एकांतात राहणं पसंत करतात. इतरांसोबत मेळ साधताना त्यांना काही आव्हानांचा सामना करावा लागतो.

धनुष्याकार ओठ

धनुष्याप्रमाणं ज्यांच्या ओठांचा आकार असतो त्या व्यक्ती सुयोग्य संवाद साधण्यासाठी ओळखले जातात. बोलण्यानंच ही मंडळी जग जिंकतात. मनातील भावनाही व्यक्त करण्यासाठी ते ओळखले जातात.

टॅग्स :lifestyle