Lips Care Tips | तुमचे ओठ काळे पडलेत! लक्षात ठेवा या पाच गोष्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lips Care Tips

काही सवयींमुळे ओठ काळे तर होतातच पण खूप कोरडे वाटू लागतात.

तुमचे ओठ काळे पडलेत! लक्षात ठेवा या पाच गोष्टी

सुंदर आणि आकर्षक ओठ (Lips) कोणाला नको असतात? विशेषतः महिलांना त्यांचे ओठ गुलाबी, सुंदर आणि आकर्षक दिसावेत अशी इच्छा असते. पण काहीवेळा काही सवयींमुळे ओठ काळे तर होतातच पण खूप कोरडे वाटू लागतात. अशावेळी, जर तुमचे ओठ देखील काळे पडले असतील आणि तुम्हाला त्यापासून मुक्ती मिळवायची असेल, तर तुम्हाला तुमच्या काही सवयी सोडाव्या लागतील. त्या सवयी सोडल्यास तुम्हाला सुंदर आणि आकर्षक ओठ मिळू शकतात. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया...

हेही वाचा: ओठ फुटणे, कोरडे पडण्याचा त्रास आहे का? घरीच बनवलेला लीप बाम करेल उपचार

डेड स्किन (Dead skin)- आपल्या ओठांवर डेड स्किन सेल्सचा थर जमा होतो, ज्याला काढून टाकणे खूप गरजेचे आहे. डेड स्किनमुळे ओठांवर सुरकुत्या पडतात. त्यामुळे ओठांची त्वचा खराब होऊ लागते. अशा परिस्थितीत, दररोज ओठांना मालिश करणे आणि डेड स्किनच्या पेशी काढून टाकणे आवश्यक आहे.

लिपस्टिक (Lipstick)- लिपस्टिकच्या वापरानेही ओठ काळे होतात. लिपस्टिकमध्ये केमिकल्सचा वापर केला जातो, त्यामुळे ओठ काळे होऊ लागतात. विशेषत: निकृष्ट दर्जाची लिपस्टिक वापरल्याने या समस्येला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत केवळ चांगल्या दर्जाची लिपस्टिक वापरणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा: परफेक्ट लिपस्टिक निवडा

स्मोकिंग (Smoking)- स्मोकिंगमुळेही ओठ काळे पडतात. जास्त स्मोकिंग करणाऱ्या व्यक्तीला ओठ काळे होण्याचा सामना करावा लागतो.

कमी पाणी पिणे (Water)- शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे ओठांचा रंग बदलतो. अशा परिस्थितीत तुम्ही जास्त प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. हिवाळ्यात या गोष्टीची विशेष काळजी घ्या आणि किमान 8 ग्लास पाणी नक्कीच प्या.

एक्‍सपायर झालेले लिप बाम (Lip balm) वापरू नका- जर तुम्ही लिप बाम वापरत असाल तर ते एक्‍सपायर होणार नाही याची काळजी घ्या. अन्यथा, तुमचे ओठ सुंदर दिसण्याऐवजी काळे होऊ शकतात.

टॅग्स :smokinglipstick