Lipstick History : पुर्वीच्या महिला ओठांना रंगवण्यासाठी किड्यांना ओठांवर चोळायच्या, हे खरंय का?

प्राचीन स्त्रिया लिपस्टिक म्हणून गेरूच्या मातीच्या तुकड्यांचा वापर करायच्या
Lipstick History
Lipstick Historyesakal

Lipstick History :

आजकाल मेकअपमध्ये सर्वात शेवटी लिपस्टीक लावली जाते. ज्यामुळे ती परफेक्ट शेड आणि परफेक्ट सेट होते. ओठांचे सौंदर्य वाढवण्यासाठी लिपस्टीकचा वापर सर्रास केला जातो.लिपस्टिक चेहऱ्याची शोभा वाढवते तर महिलांच्या सौंदर्यात भर घालते.

ओठांनाही रंगवले पाहिजे असे कोणाला बरं वाटले असेल. आणि जेव्हा लिपस्टिक अस्तित्वातच नव्हती तेव्हा ओठ रंगवले जायचे का? की दुसऱ्या कोणत्या गोष्टींनी ओठांची शोभा वाढवली जायची याबद्दल फारशी माहिती नाही.

Lipstick History
Lipstick For Winters : No Massage,No Lip Balm; फुटलेल्या ओठांचा इंस्टंट इलाज आहेत या ब्रँडेड लिपस्टिक्स

लिपस्टिकच्या इतिहासाबद्दल असे सांगितले जाते की, सुमारे 5,000 वर्षांपूर्वी, प्राचीन सुमेरियन आणि सिंधू खोऱ्यातील स्त्रिया बहुधा लिपस्टिकचा शोध लावणारे असावेत.

ओठांनाही सुंदर दिसण्याचा हक्क आहे, असे त्या काळातील लोकांनी ठरवलं अन् तेव्हापासून ओठांना रंगवणे अस्तित्वात आहे. त्या काळातील सुमेरियन लोकांनी महागडी रत्ने ठेचली अन् त्यातून बाहेर पडणारा विशिष्ट रंग चेहरा अन् ओठांवर लावला.

Lipstick History
Every Look Lipstick Shade : ट्रेडिशनल ते ट्रेंडी लूकसाठी ट्राय करा या शेडच्या लिपस्टिक

हे काय भलतच

सुमेरियन लोकांनी सुरू केलेला हा ट्रेंड त्याकाळात प्रसिद्ध झाला. अन् इजिप्शियन लोक त्यांच्या ओठांना लाल रंग देण्यासाठी क्लियोपेट्रा नावाचा लाल रंगाचा किडा हातावर चिरडून तो ओठांवर लावत असतं.

हा किडा विषारी नसतो त्यामुळे सर्रास त्याचा वापर लिपस्टिकच्या नावाखाली सुरू झाला. त्या काळात या किड्यांची पैदासही अति प्रमाणात व्हायची, त्यामुळे राणीच्या मेकअपसाठी असे किडे पाळले जायचे,असेही सांगितले जाते.

प्राचीन सिंधू संस्कृतीतील स्त्रिया लिपस्टिक म्हणून गेरूच्या मातीच्या तुकड्यांचा वापर करायच्या. लाल लाख आणि मेणापासून बनवलेल्या विशिष्ट पद्धतीच्या ओठांचा रंग आणि त्याच्या वापराची पद्धत कामसूत्रात देखील सांगितली आहे.

Lipstick History
Lipstick Shades : तुमच्या स्कीनटोनसाठी जाणून घ्या लिपस्टिकची शेड

ओठांच्या नाजूक त्वचेचे रक्षण करण्यासाठी चिनी लोकांनी 1000 वर्षांपूर्वी मेणापासून बनवलेली लिपस्टिक तयार केली, असल्याचे बोलले जाते. तांग राजवंश (618-907 ईसापूर्व) दरम्यान लिपस्टिकच्या मेणांच्या पावडरमध्ये सुगंधी तेलही घालण्यास सुरूवात झाली. ज्यामुळे तोंडाला एक विलक्षण चव आली. ऑस्ट्रेलियामध्ये आदिवासी मुली त्यांच्या पारंपरिक कार्यक्रमात चेहऱ्याला गेरूच्या लाल रंगांने रंगवतात.

Lipstick History
Best Lipstick Shades : गुलाबी रंगाच्या कपड्यांवर खुलून दिसतील ‘या’ लिपस्टिकच्या शेड्स, मिळेल तुम्हाला परफेक्ट लूक
गेरूचा लाल रंग
गेरूचा लाल रंगesakal

16 व्या शतकात राणी एलिझाबेथ प्रथम यांच्या काळात ओठांवर लाल रंगाचा मेण आणि लाल वनस्पती रंग मिसळून बनवलेली लिपस्टिक वापरण्यास सुरूवात झाली. तेव्हा इंग्लंडमध्ये लिपस्टिकची लोकप्रियता वाढली. मेण आणि फुले यांचे मिश्रण करून हा लाल रंग तयार करण्यात आला होता.

आधुनिक लिपस्टिक कोणी बनवली?

लिपस्टिकवर अनेक प्रयोग झाले तरी त्याची खरी प्रत 1870 मध्ये पॅरिसच्या मेसन गुएरलेन यांनी तयार केली होती. मेसन गुरलेन एकदा रस्त्यावरून चालत होता आणि मेणबत्ती बनवणाऱ्याचे दुकान दिसले. त्या दुकानातील व्यक्ती वेगवेगळ्या रंगातील मेणबत्त्या एका साच्यात घालून तयार करत होता.

या मेणबत्ती आणि त्याचे रंग पाहून आणि ही आयडिया सुचली. मेणबत्ती बनवणाऱ्या कर्मचाऱ्याला मेणबत्ती बनवणाऱ्याची साधने पाहून एका स्टिकच्या रूपात मेणाचे, ओठांचे कॉस्मेटिक तयार करण्याची कल्पना सुचली. 19व्या शतकाच्या अखेरीस, गुएरलेनने  मोठ्या प्रमाणावर लिपस्टिक तयार करण्यास सुरुवात केली.

1884 मध्ये पॅरिस, फ्रान्समध्ये प्रथम व्यावसायिक लिपस्टिकचा शोध लागला. 1940 मध्ये रसायन शास्त्रज्ञ हेझल बिशप यांनी पहिली जास्त काळ टिकणारी लिपस्टिक बनवली. त्यांनी लाल रंगा व्यतिरिक्त इतरही रंगात लिपस्टिक बनवायला सुरुवात केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com