
Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीचा उपवास मोडायचा नसेल तर पहा उपवासाला काय खावं काय नाही!
तूम्ही आजही नेहमीप्रमाणे लवकर उठून बसला असाल. चहाचा कप समोर आल्यावर बाजूच्याच प्लेटमध्ये ठेवलेली बिस्कीटांवर तूमची नजर पडली असेल. आणि सवयीप्रमाणे तूम्ही एक बिस्कीट उचलून चहात बुडवून तोंडात टाकलं. आणि एक दोन म्हणता म्हणता सगळी प्लेट फस्त केलीत.
तेवढ्यात आई येऊन पाठीत धपका घालून म्हणाली, गधड्या मोठ्या तोऱ्यात म्हणाला होतास की महाशिवरात्रीचा उपवास करणार मग आता काय झालं, मोडला ना उपवास.
आईचा धपाटा खाल्ल्यावर तूम्हाला केवळ पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळेच आताच सकाळी सकाळी सावधान करायला आम्ही आलो आहोत. आजच्या उपवासाला नक्की काय काय चालतं काय नाही, हे जाणून घेऊयात.
महाशिवरात्रीला भगवान शंकराची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त 18 फेब्रुवारी रात्री 12.09 वाजल्यापासून ते रात्री 1 वाजेपर्यंत आहे. याच्या व्यतिरिक्त सूर्योदयापूर्वी पूर्ण दिवस महाशिवरात्रीची पूजा करु शकता.
उपवासाला काय खावे
- उपवासाला एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी ड्रायफ्रूट्स तुम्ही खाऊ शकता. यामुळे शरीराला अधिक ऊर्जा मिळते.
- उपवासाच्या दिवशी तुम्ही फळे खाऊ शकता. केळी, सफरचंद, संत्री, डाळिंब यासारखी फळे खाऊ शकता. यामुळे तुमच्या शरीराला एक ऊर्जा मिळेल.
- उपवासाच्या दिवशी साबुदाणा, शेंगदाणे, काकवी, गुळ, बटाटे अशा सात्विक गोष्टी चालतात. त्यामुळे या गोष्टी सोडून फराळाच्या थाळीत इतर काही समाविष्ट करू नका.
- उपवासाच्या दिवशी अनेकजण बटाटा, भोपळा यापासून तयार केलेल्या भाज्या सुद्धा खाऊ शकता. या भाज्यांना सात्विक आहार मानले गेले आहे.
- उपवासाच्या दिवशी शरीराला ऊर्जा मिळावी यासाठी ज्युस, स्मूदी, लिंबू पाणी, नारळ पाणी पिऊ शकता.

उपवासाला हे खाल्ल तर चालतं
- तुम्ही शिवरात्रीच्या उपवासात थंडाई पिऊ शकता. ज्यामुळे तुमचे पोटही भरेल आणि ते निरोगीही राहाल. साध्या दुधाऐवजी त्यात ड्रायफ्रुट्स, केशर, वेलची इत्यादी टाकून दूध पिऊ शकता.
हे खाऊ नये
- बहुतेक लोक उपवासात अनेक वेळा चहा-कॉफी पितात. यामुळे, उपवास करताना तुम्हाला उलट्या, मळमळ याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे यापासून दूर राहिलेलं बरं.
- जर तुम्ही शिवरात्रीचा उपवास केला नसेल तरीही या दिवशी लसूण आणि कांदा खाऊ नका. पवित्र दिवसांमध्ये कांदा-लसूण खाऊ नये असं मानलं जाते.

उपवासाला पांढऱ्या मीठापासू्न दूर रहा
- पांढऱ्या मिठामध्ये अनेक प्रकारची रसायने असतात असे म्हणतात. त्यामुळे तुम्ही उपवासाच्या दिवशी सैंधव मीठ खाऊ शकता.
- उपवास करत असाल तर तळलेल्या पदार्थ खाऊ नका. उपवासात तळलेले पदार्थ खाल्ल्याने पोटदुखी, गॅस आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो.