Makar Sankranti 2021: संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाची कपडे का घालतात?

टीम ई-सकाळ
Thursday, 14 January 2021

संक्रांतीला काळे कपडे वापरण्यामागे वैज्ञानिक कारण देखील आहे.

Makar Sankranti Festival: भारतीय संस्कृतीत काळा रंग अशुभ मानला जातो. विशेषत: सण-उत्सव, लग्न सोहळ्याला काळ्या रंगाचे कपडे वापरत नाहीत, पण तरीही संक्रांतीला काळ्याच रंगाचे कपडे घातले जातात. या मागे नक्की काय कारण आहे? चला तर मग जाणून घेऊ या.

हिंदू धर्मात प्रत्येक सणाला काही ना काही महत्त्व आणि शास्त्रीय कारणे आहेत. संक्रांत सणाला ऋतुमानानुसार वेगळे महत्व प्राप्त आहे. 

Makar Sankranti 2021: मकर संक्रांत आणि पतंगाचं कनेक्शन काय?​

मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो असे ज्योतिषशास्त्रामध्ये मानले जाते. सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण होण्यालाच संक्रांत असं म्हटलं जातं. मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होते. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते. या दिवसापासून दिवस मोठा होतो आणि रात्र छोटी होते. मोठ्या काळोख्या रात्रीला निरोप देण्यासाठी काळे कपडे घातली जातात. 

संक्रांतीला काळे कपडे वापरण्यामागे वैज्ञानिक कारण देखील आहे. मकर संक्रांत हा सण हिवाळ्यात येतो. पांढरा रंग कसा उष्णता शोषून घेत नाही, तसा काळा रंग हा ऊष्णता शोषून घेतो. त्यामुळे थंडीच्या दिवसात शरीर उबदार रहावे  म्हणजे संक्रांतीला काळे कपडे वापरतात. तसेच तिळ खाल्याने शरीरात उष्णता निर्माण करण्यास उपयुक्त ठरतात त्यामुळे  सांस्कृतिक तिळगुळ खाल्ला जातो.

Makar Sankranti 2021 : तिळा-गुळाच्या गट्टीचं काय आहे आरोग्यदायी महत्त्व?​
 
आजच्या काळात आता काळ्या रंगाकडे शुभ अशुभ या पलिकडेही पाहिले जाते. आता  संक्रांती शिवाय देखी काळ्या रंगांचे कपडे वापरले जातात. त्यामुळे मुलींची खासकरून काळ्या रंगाला पसंती असते. आता मुलांना देखील काळा रंग उठून दिसतो. आता काळ्या रंगाकडे फॅशन म्हणून पाहिले जात आहे.

- लाइफस्टाइलसंबंधी इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: makar sankranti 2021 why black color use know reason