Makar Sankranti Fashion : हळदी कुंकवात तुम्हीच दिसाल उठून, ट्राय करा लेटेस्ट फॅशन

सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रातीचा सण साजरा केला जातो
Makar Sankranti Fashion
Makar Sankranti Fashionesakal

Makar Sankranti Fashion : सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रातीचा सण साजरा केला जातो. या दिवशी सगळे लोकं एकमेकांना तीळ-गूळ देऊन त्यांना निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा देत सण साजरा करतात. थंडीमध्ये तीळ आणि गूळ दोघांनाही खूप आरोग्यदायी महत्व आहे अन् ते खाल्ल्याने आपल्याला थंडीचा त्रास होत नाही.

Makar Sankranti Fashion
Hyderabadi Recipe : भांडी नव्हती म्हणून शिजवले दगडावर मटण! हैद्राबादच्याा या डिशची जगभर चर्चा!

संक्रातीच्या दिवशी अनेक बायका हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवतात; एकमेकींना सवाष्णीचे वाण देतात. या दिवशी सगळ्याच बायका काळी साडी नेसण्याला प्राधान्य देतात. नवीन लग्न झालेल्या बायकांची तर वेगळीच हौस असते, लग्नापासून पुढचे 5 वर्ष हे हळदी कुंकू दरवर्षी करावेच लागते त्यामुळे बायका खूप मजा करतात.

Makar Sankranti Fashion
Vastu Tips : शनिदोष सुरू झाला आहे? या रोपट्याने पडेल फरक!

खूप बायका एकत्र येणार म्हणजे गप्पा आणि चर्चेला उधाण येणार आणि त्यात सगळ्यांना आपलीच साडी छान असावी असं वाटत असतं, पण नक्की कोणती साडी विकत घ्यावी हा प्रश्न असतोच.. तुम्ही या टिप्स त्यासाठी फॉलो करू शकतात.

Makar Sankranti Fashion
Vastu Tips: घरामध्ये कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे? काय सांगितलंय वास्तुशास्त्रात जाणून घ्या...

1. काठ पदर

साडी म्हटली की पहिला प्रकार डोक्यात येतो तो म्हणजे काठ पदर. काठ पदारच्या काळ्या साड्या खूप जास्त सुंदर दिसतात, शिवाय याच्यावरती तुम्ही कोणत्याही प्रकारचे दागिने सुद्धा घालू शकतात. त्यात सध्या बाजारात काठ पदराच्या साडीवर गोल्डन ऐवजी सिल्व्हर बॉर्डर आली आहे जी खूप सुंदर दिसते.

Makar Sankranti Fashion
Astro Tips : दर बुधवारी करा बुध ग्रहाच्या या मंत्रांचा जप! कसलीच कमी भासणार नाही..

2. केरळी कॉटन

बाकीचे प्रकार एकवेळेस लोकांकडे सापडतीलही पण केरळी कॉटन प्रत्येकाकडे असतेच असं अजिबात नाही; मुळात कॉटनच्या साड्या प्रत्येकाला आवडत नाहीत पण जर तुम्ही फॅब्रिकच्या प्रेमात असाल तर केरळी कॉटन परफेक्ट आहे. सध्या यात गोल्डन सोडून इतरही रंगाचे काठ आले आहेत.

Makar Sankranti Fashion
Heart Attack : पहाटे हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण का जास्त असते?

3. डिझाईनर साडी

कार्यक्रमाची गोष्ट सुरू असेल आणि डिझाईनर साडी नाही असं कसं होईल? जर तुम्हाला टिपिकल साडी नेसण्याची इच्छा नसेल तर तुम्ही डिझाईनर साडी नेसू शकतात. सध्या नेटच्या आणि त्यावर बारीक एम्ब्रोडरी केलेल्या साड्या बाजारात आल्या आहेत या तुम्हाला खूप रॉयल लुक देतील.

Makar Sankranti Fashion
Winter Health Care : हिवाळ्यात जास्त पाणी पिता? सावधान, ओढावू शकतो मृत्यू

4. ऑर्गेन्झा किंवा नेट साडी

ऑर्गेन्झा साडी खूप सुंदर असतात; सध्या याची फॅशन सुद्धा सुरू आहे, तुम्ही हा लुक आपल्या ऑफिससाठीही ट्राय करू शकतात. यावरती छान आंबाडा आणि मोगऱ्याचा गजरा खूप छान दिसेल. जर तुम्हाला ऑर्गेन्झा साडी आवडत नसतील तर तुम्ही नेटचीही साडी नेसू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com