Health Tips: दुधावरची साय त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक!

दुधापासून अनेक प्रकारचे पदार्थ तयार केले जातात.
Health Tips
Health Tipssakal

दुधापासून अनेक प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. तुम्हाला हे माहित असेलच की दूध आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे आणि त्यात किती आवश्यक पोषक तत्वे आढळतात. बरेचदा असे दिसून आले आहे की लोक मलाई फेकून देतात. दूध पिताना लहान मुलेही मलाई पाहून वाकडं तोंड करू लागतात.

दुधाचे खरे पौष्टिक मूल्य मलाईमध्ये दडलेले असते हे अनेकांना माहीत नसते. जर तुम्ही याचे सेवन सुरू केले तर शरीरावर अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतील. जाणून घेऊया मलाईचे फायदे...

Health Tips
Health Tips : नारळ पाणी फक्त पिण्यासाठीच नाही तर त्वचेसाठी देखील उत्तम

मलाईचे फायदे

1. भरपूर पोषक

दुधात अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात. पण यासोबतच मलाईमध्ये भरपूर पोषक तत्वही आढळतात. मलाईमध्ये व्हिटॅमिन ए, डी आणि ई आढळतात, ज्यामुळे आरोग्यास अनेक प्रकारे फायदा होतो. याशिवाय त्यात पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमही चांगल्या प्रमाणात आढळते.

2. त्वचेसाठी सर्वोत्तम

मलाई त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. कारण त्यात प्रथिने आणि चरबी जास्त प्रमाणात आढळतात. त्यामुळे त्यांचे सेवन केल्याने तुमची त्वचा निरोगी आणि मुलायम राहते. मलाई खाण्यासोबतच चेहऱ्यावरही लावू शकता. यामुळे तुम्हाला चमकणारा चेहरा मिळण्यास मदत होईल.

Health Tips
Force Feeding : तुम्हीही मुलांना जबरदस्ती खाऊ घालता का? वेळीच बदला सवय

3. वेट कंट्रोल

असे मानले जाते की मलाईमध्ये चरबीची उपस्थिती आढळते. पण जर तुम्ही याचे मर्यादित प्रमाणात सेवन केले तर तुमच्या शरीराला अनेक फायदे होतील आणि वजनही नियंत्रणात राहील.

4. मेंदूच्या आरोग्यासाठी उत्तम

मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही रोज मलाईचे सेवन करू शकता. यामध्ये सॅच्युरेटेड फॅट मुबलक प्रमाणात आढळते, जे मेंदूचे कार्य योग्यरित्या करण्यास मदत करते.

5. हाडांचे आरोग्य

हाडे निरोगी ठेवण्यासाठी मलाईचे देखील सेवन केले जाऊ शकते. मलईमध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. यामुळे कमकुवत हाडे बरे होतात आणि ते मजबूत होतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com