Old Car खरेदी करताना घ्या या गोष्टींची काळजी, नाहीतर होईल नुकसान

जुनी कार खरेदी करत असताना Old Car Purchase महत्वाच्या कागदपत्रांसह गाडीच्या काही भागांची म्हणजेच टेक्निकल तपासणी करणंही गरजेचं आहे
old car buying guide
old car buying guideEsakal

Old car buying guide: एखादी कार असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र काही वेळेला बजेट Budget कमी असल्याने अनेकजण सेकंडहॅण्ड म्हणजेच जुनी कार Old Car खरेदी करण्याचा निर्णय घेतात.

जुनी कार खरेदी करत असताना अनेक गोष्टींची काळजी घेणं अत्यंतं गरजेचं आहे. अन्यथा तुमचं मोठं नुकसान होवू शकतं. Marathi Automobile News check before purchasing old car to avoid loss

जुनी कार खरेदी करत असताना Old Car Purchase महत्वाच्या कागदपत्रांसह गाडीच्या काही भागांची म्हणजेच टेक्निकल तपासणी करणंही गरजेचं आहे. जर तुम्हाला गाडीविषयी Car फारशी माहिती नसेल तर यासाठी तुम्ही एखाद्या मॅकेनिकची देखील मदत घेऊ शकता.

टेस्ट ड्राइव्ह- जेव्हा तुम्ही जुनी कार खरेदी करता तेव्हा तिची टेस्ट ड्राइव्ह Test Drive घेणं अत्यंत गरजेचं आहे. ही टेस्ट ड्राइव्ह घेत असताना घाई करू नका. किमान १०-१२ किलोमीटर तरी कार चालवा. कार चालवत असताना ती वेगवेगळ्या स्पीडला चालवून पहा.

टेस्ट ड्राइव्ह वेळी काही मिनिटांसाठी कार हाय स्पीडवर High Speed देखील चालवून पहा, यावेळी एखादी वायर जळल्याचा वास तर येत नाही ना याकडे लक्ष द्या. तसचं गाडीचा विचित्र आवाज येत नाही ना. एसी योग्य रित्या काम करतेय ना. ब्रेक, क्लच यांकडे लक्ष द्या.

गाडीच्या आवाजावर लक्ष द्या- जुनी गाडी खरेदी करत असताना तिचा आवाज तपासणं गरजेचं आहे. यासाठी गाडी स्टार्ट करून न्यूट्रल गियरवर ठेवा आणि गाडीत बसून गाडीत येणारा आवाज आणि व्हायब्रेशनवर लक्ष द्या. तसचं अॅक्सीलरेटर कमी जास्त करून येणारा आवाजही तपासून पहा. जर तुम्हाला जास्त आवाज किंवा व्हायब्रेशन जाणवलं तर त्यात बिघाड असण्याची शक्यता असू शकते.

हे देखिल वाचा-

old car buying guide
Automatic Cars : गिअरची कटकट नको म्हणून ऑटोमॅटिक कार घेताय? आधी हे तोटे वाचाच

गाडीचा धूर तपासा- जुनी गाडी खरेदी करत असताना तिचा फिटनेस, तपासणं गरजेचं आहे. यासाठीच गाडीच्या सायलेंसरमधून येणाऱ्या धुराचा रंग पहा. धुराचा रंग निळा किंवा गडद काळा असेल तर इंजिनमध्ये गडबड असण्याची शक्यता असते. तसंच इंजिनमध्ये ऑइल लिकेजची समस्या असू शकते. शक्य झाल्यास एखाद्या चांगल्या मॅकेनिककडून इंजिन तपासून घ्या.

फायनान्स पॉलिसी- जुनी गाडी घेताना ती कोणत्या स्थितीत आहे ते पाहण्यासोबतच गाडीची कागदपत्रं पडताळून घेणं तितकच गरजेचं आहे. यावेळी गाडीच्या विम्याचे कागद तपासावेत ज्यावरून गाडीची किंमत ठरवण्यास सोप होईल,

तसचं मागील २-३ वर्षातील क्लेम बोनस तपासून पहा. यामुळे गाडीचा अॅक्सिडंट किंवा इतर कारणांमुळे काही दुरुस्ती करण्यात आली आहे का किंवा एखादा नवा पार्ट बसवण्यात आला आहे का हे लक्षात येईल.

old car buying guide
Car Care Tips : रस्त्यावर साचलेल्या पाण्यात गाडी अचानक बंद पडली तर काय करावं?

कागदपत्रं- जुनी कार खरेदी करत असताना संपूर्ण कागदपत्र असणं आवश्यक आहे. यात आरसी, पीयुसी आणि विम्याची कागदपत्रं पडताळू घ्यावी. तसचं कारचं सेल लेटरही तपासावं.

अशा प्रकारे जुनी कार खरेदी करताना काही गोष्टी ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जुनी कार खरेदी करताना ती जास्त जुनी असू नये. अनेकदा स्वस्त कार घेण्याच्या मोहामध्ये अनेकजण अत्यंत जुनी कार खरेदी करतात.

लक्षात घ्या अनेक राज्यांमध्ये १५ वर्षांहून जुन्या कारला बंदी घालण्यात आली आहे. त्याच प्रमाणे सुरक्षिततेच्या दृष्टीने देखील जास्त जुनी कार खरेदी करणं जोखमीचं ठरू शकतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com