रोजच्या स्वयंपाकाने Gas Burners तेलकट आणि चिकट झाले आहेत? मग असे स्वच्छ करा बर्नर

gas burner cleaning hacks: गॅसच्या बर्नरमध्ये घाण किंवा तेलकट थर जमा झाल्याने त्याची कार्यक्षमता तर कमी होतेच शिवाय असे जाम झालेले बर्नर धोकादायकही ठरू शकतात यासाठीच हे बर्नर वरचेवर स्वच्छ करणं अत्यंत गरजेंचं आहे
gas burner cleaning hacks
gas burner cleaning hacksEsakal

Gas burner cleaning hacks: गॅस स्टोव्ह ही गोष्ट आजही प्रत्येकाच्या घरात आढळतेच. मायक्रोव्हेव Microwave किंवा इंडक्शन Induction अशी स्वयंपाकासाठी नवी साधनं आली असली तरी भारतात आजही मोठ्या प्रमाणात स्वयंपाक शिजवण्यासाठी गॅस स्टोव्हचा वापर केला जातो. Marathi Tips How to clean your gas burner with handy goods

गॅस शेगडी वापरणं सोपी असते. रोजता स्वयंपाक झटपट होण्यासाठी गॅस शेगडी हाच एक चांगला पर्याय आहे. मात्र दिवस रात्र सतत स्वयंपाक Cooking नाश्ता आणि चहा करण्यात अनेकदा आपण गॅसची वरचेवर स्वच्छता करत असलो तरी अनेकदा गॅसच्या बर्नरवर Gas Burner दूध किंवा आमटी उतू गेल्याने ते घाण, तेलकट होतात.

तसंच अनेकजण बर्नरवर वांग्याच्या भरीतासाठी वांगी भाजणं, किंवा कांदा, सुकं खोबरं भाजणं या सर्वामुळे गॅसचे बर्नर जाम होतात. यामुळे त्यातून पुरेला गॅस बाहेर न पडल्याने पदार्थ शिजण्यास वेळ लागू शकतो.

गॅसच्या बर्नरमध्ये घाण किंवा तेलकट थर जमा झाल्याने त्याची कार्यक्षमता तर कमी होतेच शिवाय असे जाम झालेले बर्नर धोकादायकही ठरू शकतात यासाठीच हे बर्नर वरचेवर स्वच्छ करणं अत्यंत गरजेंचं आहे. गॅसचे बर्नर कसे स्वच्छ करायचे हे इथं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१. लिबाच्या मदतीने बर्नर करा स्वच्छ- गॅसचा बर्नर स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा वापर करु शकता. लिंबाच्या मदतीने बर्नर स्वच्छ केल्यास बर्नरवरील छिद्रांमध्ये साचलेली घाण निघून जाण्यास मदत होईल. गॅसचे बर्नर हे तांब्याचे असतात त्यामुळेच लिंबाचा वापर केल्याने ते अगदी नव्या प्रमाणे चमकू लागतात.

या उपायासाठी एक लिंबू कापून त्याचे दोन तुकडे करा. आता लिंबाच्या फोडीवर थोडं मीठ घ्या आणि लिंबाने बर्नर रब करा. ५-१० मिनिटांसाठी हा लिंबाचा रस असाच राहू द्या. त्यानंतर स्वच्छ पाण्याने बर्नर धुवा आणि पहा कमाल.

हे देखिल वाचा-

gas burner cleaning hacks
Cooking Gas सुरू करताना तुम्ही देखील ही चूक करताय का? त्यासाठी माचिस वापरणं किती योग्य?

२. डिश वॉशिंग लिक्विडचा करा उपयोग- एका वा़डग्यात गरम पाणी घ्या. गरम पाण्यामध्ये १ चमचा डिश वॉशिंग लिक्विड टाका. त्यानंतर या पाण्यामध्ये बर्नर अर्धा तासासाठी बूडवून ठेवा. एखाद्या टुथब्रशच्या मदतीने बर्नर स्वच्छ घासा. यामुळे बर्नरच्या छिद्रांमधील घाण स्वच्छ होण्यास मदत होईल. त्यानंतर बर्नर स्वच्छ पाण्याने धुवा.

३. व्हिनेगरनी करा बर्नर स्वच्छ- बर्नर स्वच्छ करण्यासाठी तुम्ही व्हिनिगरचा देखील वापर करू शकता. यासाठी एका वाडग्यात अर्धा कप व्हिनिगर आणि दोन चमचे मीठ घ्या. हे मिश्रण बर्नरवर टाका.

त्यानंतर हे बर्नर तुम्ही १० मिनिटांसाठी या मिश्रणातच बुडवून ठेवा. त्यानंतर बर्नर स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे बर्नर नव्या प्रमाणे चमकू लागतील, लक्षात घ्या बर्नर पूर्ण वाळल्यानंतर पुन्हा बसवा.

४. फ्रूट सॉल्ट किंवा इनोचा वापर- बर्नर पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही फ्रूट सॉल्ट किंवा अॅसिडीटीसाठी घेतल्या जाणाऱ्या इनोचा देखील वापर करू शकता. यासाठी एका वाडग्यात गरम पाणी घेऊन त्यात फ्रूट सॉल्ट टाका. यात एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा लिक्विड डिटर्जंट टाका.

हे मिश्रण चांगल मिक्स करून घ्या. या मिश्रणात बर्नर १० मिनिटांसाठी बुडवून

ठेवा. त्यानंतर ब्रशच्या मदतीने बर्नर स्क्रब केल्यास ते अगदी सहज स्वच्छ होईल आणि नव्या सारखं चमकू लागेल.

५. बेकिंग सोडा- स्वच्छता कऱण्यासाठी बेकिंग सोडा हा एक उत्तम पर्याय आहे. अनेक वस्तूवरील चिकट किंवा तेलकट डाग बेकिंग सोड्याच्या मदतीने दूर करता येतात. बर्नरचा तेलकटपणा आणि त्यात साचलेलं कार्बन दूर कऱण्यासाठी बेकिंग सोडा फायदेशीर ठरू शकतो.

यासाठी एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात बर्नर टाकावे. यात १ चमचा लिंबाचा रस टाकावा. या लिंबाच्या पाण्यात बर्नर १० मिनिटांसाठी राहू द्या. त्यानंतर यात हळूहळू बेकिंग सोडा टाका.

२० मिनिटांसाठी बर्नर या पाण्यातच राहू द्या. त्यानंतर डिश वॉशिंग लिक्विड आणि ब्रशच्या मदतीने बर्नर स्वच्छ करा. यामुळे जाम झालेली छिद्रे मोकळी होतील.

अशा काही सोप्या टिप्सच्या मदतीने तुमच्या गॅसचे बर्नर सहज नव्या प्रमाणे स्वच्छ होतील आणि चमकू लागतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com