गांजा आणि भांगेत नेमका फरक काय?

कुठल्याही अंमली पदार्थाचे सेवन करणं म्हणजे स्वतःहून संकटांना आमंत्रण देणे
Marijuana Vs Hemp
Marijuana Vs Hempesakal
Updated on

Marijuana Vs Hemp : कुठल्याही अंमली पदार्थाचे सेवन करणं म्हणजे स्वतःहून संकटांना आमंत्रण देणे. आपल्याकडे जितके मजेसाठी अमली पदार्थांचे सेवन केले जाते त्याव्यतिरिक्त आपले रोजच्या आयुष्यातले मानसिक, आर्थिक ताणतणाव विसरणे यासाठीही गरीब, श्रीमंत, मध्यमवर्गीय अशा सगळ्या स्तरांतले लोक सिगारेट, दारूचं सेवन करतात.

Marijuana Vs Hemp
Parenting Tips: पालकांच्या अति काळजीमुळे बिघडतेय तरुण पिढी? या चुका टाळा

दारू आणि सिगरेट सेवनाबाबत विचार करतानाच आपला मेंदू इतका सावध होत असेल तर मग गांजा, भांग यांच्याविषयी बोलायलाच नको.

आज जरी भारतात गांजाच्या विक्रीवर कायद्याने बंदी असली तरी असा एक काळ होता जेव्हा भारतात गांजा कायदेशीररित्या विकला जायचा.

Marijuana Vs Hemp
Parenting Tips: पालकांच्या अति काळजीमुळे बिघडतेय तरुण पिढी? या चुका टाळा

आता कायद्याचा भाग वगळला तर गांजा आणि भांग हे दोन्ही पदार्थ नशेसाठी वापरले जात असल्याने गांजा आणि भांग एकाच कुटुंबातील असल्याचं सांगण्यात येतं. पण भांग विकणे हा गुन्हा आहे. मग प्रश्न असा आहे की या दोघांमध्ये काय फरक आहे, ज्यामुळे या दोघांच्या विक्रीसाठी वेगवेगळे नियम आहेत.

Marijuana Vs Hemp
Parenting Tips: आईवडिलांमधील भांडण 'नॉर्मल' समजणं बंद करा, मुलांवर होतात हे परिणाम

भांग आणि गांजा यात काय फरक आहे?

भारतात जे Cannabis या Marijuana नावाचं जे झुडूप उगवतं त्याच Scientific नाव आहे Cannabis Indica. बेसिकली याला सगळीकडे भांगेचे किंवा गांजाच झाड म्हंटलं जातं. भांग आणि गांजा एकाच प्रजातीच्या वनस्पतीपासून बनवले जातात.

ही प्रजाती नर आणि मादीमध्ये विभागली गेली आहे, ज्यामध्ये नर प्रजातीपासून भांग आणि मादी प्रजातीपासून गांजा बनवला जातो. पण हे उपपदार्थ बनवण्याच्या पद्धती भिन्न आहेत.

Marijuana Vs Hemp
Angarki Chaturthi : अंगारकी चतुर्थी निमित्त फराळासाठी बनवा खास उपवसाची इडली

या झाडाच्या सुकलेल्या कळ्यांना पानांना संस्कृत मध्ये गांजा म्हंटल जात. गांजा बनवतना या वनस्पतीच्या फुलाचां वापर केला जातो. या वनस्पतीची फुलं पान वाळवून तो धुराच्या स्वरूपात जाळला जातो. असे म्हणतात की त्याचा झटपट परिणाम होतो, म्हणजेच तुम्हाला याची नशा लवकर चढते. याला वीड, पॉट असं पण म्हंटल जात.

Marijuana Vs Hemp
Angarki Sankashti Chaturthi: संकष्टीच्या उपवासाला चालणारा बटाटा भारतात कधी आला

आता या झाडाला जी फुल येतात, त्याच्या कळ्या हातावर घेऊन घासल्या की एक चिकट असा काळा थर जमा होतो. त्या काळया थराचा एक गोळा बनतो. यालाच चरस किंवा मग हशीश असं म्हंटल जातं. भारत, पाकिस्तान, नेपाळ आणि लेबनान अशा देशांमध्ये हशीश किंवा चरस हातावर रागडूनच बनवलं जात.

Marijuana Vs Hemp
Heart Attack : पहाटे हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण का जास्त असते?

आणि जेव्हा कोणाच्या खाण्यापिण्यात गांजाच्या झाडाच्या वाटलेल्या पानांचा गोळा टाकला जातो त्याला भांग म्हंटल जातं. होळीच्या दिवशी जी थंडाई बनवली जाते त्यात भांग मिसळलं जातं. याव्यतिरिक्त उत्तरेकडच्या राज्यांत भांगची भजी हलवा असे पदार्थ पण बनवले जातात.

Marijuana Vs Hemp
Heart Health : निरोगी हृदयासाठी कसा असावा आहार ?

पूर्वी भांग खुलेआम वापरता यायचं, परंतु 1985 नंतर त्यावर बंदी घालण्यात आली. त्यानंतर राजीव गांधींच्या सरकारने 1985 मध्ये NDPS म्हणजेच नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा आणला.

त्यानंतर गांजावर बंदी घालण्यात आली. या कायद्यात गांजाच्या झाडाची फळे आणि फुलांचा वापर गुन्ह्याच्या श्रेणीत ठेवण्यात आला होता. म्हणजेच त्याची फुलं बेकायदेशीर आहेत आणि पानांचा वापर कायदेशीर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com