Lifestyle Tips : Healthy राहण्यासाठी हॅप्पी रहा, आनंदाने होतील आजार दूर

Mental Health : आनंदी राहिल्याने अनेक मानसिक आणि शारिरीक आजार Mental Illness कमी होऊ शकतात हे अनेक संशोधनामधून सिद्ध झालं आहे. आता आनंदी राहण्यासाठी नेमकं काय करावं असा प्रश्न अनेकांना पडतो. काय करता येईल यासाठी....वाचा.....
का रहायचे हॅपी
का रहायचे हॅपीEsakal
Updated on

Mental Peace : ताण, तणाव ही अलिकडीची एक मोठी समस्या ठरतेय. कामाचा वाढता ता Work Tension, शिक्षणापासून ते नोकरी आणि सगळ्याच ठिकाणी वाढणारी स्पर्धा, महागाई, नातेसंबध आणि अशा अनेक गोष्टींमध्ये सध्या अनेकांमध्ये ताण-तणाव वाढताना दिसतोय. Mental Peace what is importance to be happy in daily life

हा स्ट्रेस Stress किंवा तणाव वेळीच दूर न झाल्य़ास कालांतराने त्याचं रुपांतर नैराश्यात Depression होतं आणि अनेकदा इतरही मानसिक आजार निर्माण होतात. एवढचं नव्हे तर ताण आणि तणावामुळे गेल्या काही वर्षामध्ये नैराश्यासोबतच, मधुमेह Diabetes, ब्लड प्रेशर आणि इतर अनेक शारिरीक समस्यांचं प्रमाण वाढत असल्याचं समोर आलं आहे.

यासाठी तणावमुक्त आयुष्य जगणं गरजेचं आहे. अर्थातच तणावमुक्त आयुष्य जगण्यासाठी आनंदी राहणं हे अत्यंत गरजेचं आहे.

आनंदी राहिल्याने अनेक मानसिक आणि शारिरीक आजार Mental Illness कमी होऊ शकतात हे अनेक संशोधनामधून सिद्ध झालं आहे. आता आनंदी राहण्यासाठी नेमकं काय करावं असा प्रश्न अनेकांना पडतो. यासाठी काहीजण इंटरनेटवर देखील आनंदी राहण्याचे मार्ग शोधत असतात. यासाठीच आम्ही तुम्हाला आनंदी जीवन जगण्याचे काही सोपे मार्ग सांगणार आहोत. यामुळे अर्थात तुमचा ताण-तणाव कमी होईल आणि आजारही दूर पळतील.

पुरेशी झोप- झोप ही आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अत्यंत गरजेची आहे. पुरेशी झोप न झाल्यास चिडचिड होत असल्याचा अनुभव तर तुमच्यापैकी अनेकांनी घेतलाच असेल.

आनंदी राहण्यासाठी ७-८ तासांची चांगली झोप घेणं अत्यंत गरजेचं आहे. काही संशोधकांच्या मते पुरेशी झोप न झाल्यास नकारात्मक प्रवृत्ती वाढण्यास सुरुवात होते आणि नकारात्मकता वाढू लागण्यास व्यक्ती तणावात आणि चिंतेत राहू लागतो. यासाठी वेळेवर आणि योग्य झोप घेणं गरजेचं आहे.

हे देखिल वाचा-

का रहायचे हॅपी
Happy Life : जीवनाचा आनंद हरवलाय? परत मिळवा या 6 स्टेप्सने

नकारात्मक गोष्टींचा विचार बंद करा- आनंदी राहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला नकारात्क गोष्टींचा विचार करणं थांबवणं गरजेचं आहे. अनेकांना नकारात्मक विचार मनातून काढून टाकण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. मात्र यासाठी तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींच्या मदतीने या नकारात्मकतेवर मात करू शकता.

तुम्ही आवडते छंद जोपासून, गाणी ऐकून नकारात्मक विचार दूर कऱण्यासाठी प्रयत्न करू शकता. सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचे विचार कागदावर लिहा आणि ते फाडून किंवा जाळून टाका यामुळे तुम्हाला हलकं वाटेल.

इतंराबद्दलचा द्वेष मनातून काढून टाका- एखाद्या व्यक्तीचा सतत द्वेष करणं किंवा राग मनात धरणं यासाठीन कळत तुमची बरीच ऊर्जा खर्च होत असते. यासाठी जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला दुखावलं असेल तर त्या व्यक्तीबद्दलचा तुमच्या मनातील राग काढून टाका. बघा तुम्हाला खूप हलकं वाटेल.

कुणाविषयी मनात राग किंवा खंत किंवा मत्सर अशा भावना नसतील तर तुम्हाला कायम आनंदी वाटू लागेल.

इतरांशी तुलना करणं बंद करा- आनंदी राहण्यासाठीचा हा एक सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणता येईल. प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असल्याने इतरांशी तुलना करणं आणि स्पर्धा करणं याला केव्हाही अंत नसतो. यामुळे केवळ चेहऱ्यावरील आनंद नाहिसा होतो.

यासाठी केवळ स्वत:शी तुलना करा. तुम्ही एक एक पायरी चढत कुठवर आला आहात. तुम्ही अजून किती प्रगती करू शकता? हे पाहून तुमचं ध्येय साधण्याचा प्रयत्न करा. इतरांसारखं बनण्याचा प्रयत्न करण्याएवजी तुम्ही जसे आहात तसं राहिलात तर तुम्ही जास्त आनंदी रहाल.

योगा आणि मेडिटेशन- तणाव दूर करून आनंदी राहण्यासाठी तुम्ही तुमच्या दिनचर्येमध्ये योगा आणि मेडिटेशनचा समावेश करू शकता. योगा आणि मेडिटेशनमुळे तणाव कमी होण्यास मदत होते. फिटनेटची आवड जोपासल्यास तुम्ही सक्रिय राहता आणि आनंदी रहता.

तसचं सकाळच्या वेळी शक्य असल्यास हिरव्या गवतावर अनवाणी चाला यामुळे हॅप्पी हार्मोन्स रिलीज होतात.

हे देखिल वाचा-

का रहायचे हॅपी
Happiness Mantra : टेंशन फ्री खुश राहाण्यासाठी फक्त एवढं करा

या शिवाय काही इतर गोष्टी तुम्ही रोजच्या दिनचर्येत अवलंब केल्यास तुम्ही नक्कीच आनंदी रहाल. यात जास्तीत जास्त वेळ तुमच्या आवडत्या लोकांच्या संपर्कात रहाण्याचा प्रयत्न करा. भेटणं शक्य नसेल तर एका फोन कॉलवर तुम्ही तुमच्या आवड्या मित्र-मैत्रिणींसोबत, भावंडासोबत किंवा कुटुंबियांसोबत रोज संवाद साधल्यास आनंदी रहाल.

चुगल्या किंवा नकारात्मकता पसरवणाऱ्या लोकांपासून दूर रहाण्याचा प्रयत्न करा.

स्वत:ला रोजच्या आयुष्यात काही चांगल्या सवयी लावा. यामुळे तुमची दैनंदिन कामं योग्यरित्या होतील. या सवयींमुळे तुम्हाला आनंदी राहण्यासही मदत होईल.

धकाधकीच्या जीवनातून थोडासा वेळ काढून एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करण्याचा प्रयत्न करा. ही मदत पैशांची असेल किंवा इतर प्रकारची. मात्र या मदतीमुळे तुम्हाला मोठा आनंद मिळेल.

तुमचे आवडीचे छंद किंवा कला जोपासण्यासाठी वेळ काढा आणि पहा तुम्हाला आनंदी राहण्यास नक्की मदत होईल.

अशा प्रकारे आपला आनंद हा आपल्याच हातात आहे. मात्र तो मिळवायचा कसा आणि कसा टिकवून ठेवून कायम आनंदी रहावं यासाठी तुम्हालाच प्रयत्न करणं गरजेचं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.