Monsoon: पावसाळ्यात डोक्याला खूप खाज येत असेल तर वापरा हे घरगुती हेअर पॅक

पावसाळ्यात केसांचे आरोग्य अधिकच खराब होते.
Homemade Hair pack
Homemade Hair packEsakal
Updated on

पावसाळ्यात केसांचे आरोग्य अधिकच खराब होते. कारण पावसाळ्यात स्काल्पवर अधिक प्रभाव पडतो. पावसाचे पाणी हे प्रदूषित पाणी असते त्यामुळे हे पाणी तुमच्या केसांच्या मुळांना अत्यंत नुकसानदायी ठरते आणि यामुळे केस अधिक खराब होतो आणि केसांच्या मुळामध्ये खाज येऊ लागते.

कधी कधी ही खाज इतकी वाढते की, केसांच्या मुळाची त्वचा खाजवल्याने खराब होते आणि त्यामुळे त्याचा आपल्या आरोग्यावरही परिणाम दिसून येतो. यामुळे केसां मध्ये पिंपल्सदेखील येतात.पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात केस तुटतात, केस तुटण्याची कारणेही वेगवेगळी असतात. ही केस तुटणे थांबावे यासाठी काही घरगुती उपायाही आहे. केसांच्या वेगवेगळ्या समस्येवर घरच्या घरी वेगवेगळे हेअर पॅक कसे तयार करावे, आणि ते कसे केसांच्या मुळाशी लावावे, याची सविस्तर माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत.

1) कोरड्या केसांसाठी मेथीचे पाणी (Fenugreek Seeds Water For Dry Hair)

कोरड्या केसांची समस्या पावसाळ्यात अधिक जाणवते. कोरड्या केसांमुळे केसांमध्ये गुंताही अधिक प्रमाणात होतो. आणि या अशा केसांना निट करण्यासाठी सतत पार्लरला जाणे ही सर्वसामान्य मुलीना परवडत नाही मग अशावेळी घरघुती सोपे उपाय करून तुम्ही तुमचे केस घरच्या घरीच निट करु शकता.

हेअर पॅक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य:

1 कप मेथीचे पाणी, 1 मोठा चमचा मध, 1 कप कोरफड जेल

हेअर पॅक बनविण्याची पद्धत:

सर्वात पहिल्यांदा तुम्ही 2 मोठे चमचे मेथीचे दाणे पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी गाळून घ्या. त्यात मध आणि कोरफड जेल मिक्स करा. आता हा हेअर पॅक

केसांच्या मुळाशी लावा. हा हेअर पॅक केसांना लावल्यानंतर अर्धा तास केस तसेच ठेवा, आणि मग स्वच्छ पाण्याने धुवून काढा.तुमचे केस मस्त झालेली असतील.

Homemade Hair pack
पावसाळ्यात केस गळतात? तेल किंवा शँम्पू बदलण्याची गरज नाही, करा फक्त ‘ही’ पाच योगासने

2) तेलकट केसांचा स्काल्प स्वच्छ करण्यासाठी उपाय (Home Remedies For Oily Hair)

तेलकट केसांमुळे तुमच्या चेहऱ्याचा लुक पटकन खराब होतो. तेलांमुळे चेहराही अगदी फिका दिसू लागतो. तसंच तेलकट केसांमुळे केसांच्या मुळाशी धूळ आणि माती चिकटून बसते. त्यामुळे हा सोपा इलाज तुम्ही करू शकता.

हेअर पॅक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य:

1 कप मेथीचे पाणी, 1 मोठा चमचा लिंबाचा रस, 1 कप ताक

हेअर पॅक बनविण्याची पद्धत:

मेथीचे पाणी, लिंबाचा रस आणि ताक हे मिश्रण एकत्र करा आणि तुमच्या केसांच्या मुळाशी लावावा.अर्धा तासानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे.

Homemade Hair pack
Religious Rules: रात्री केस आणि नखे का कापत नाहीत? 99 टक्के लोकांना माहीत नसते कारण

डॅमेज केसांसाठी उपाय (Home Remedies For Damaged Hair)

वाढते प्रदूषण आणि आपल्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे अनेकांना केसगळती, केस लवकर पांढरे होणे आणि केस डॅमेज होण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्यावर तुम्ही घरच्या घरी सोपा उपाय करु शकता.

हेअर पॅक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य:

1 कप मेथीचे पाणी, 1 कप आवळा, रीठा आणि शिकेकाई, 1 लहान चमचा ऑलिव्ह ऑईल

हेअर पॅक बनविण्याची पद्धत:

मेथीचे पाणी, आवळा, रीठा आणि शिकेकाईचे पाणी तसंच ऑलिव्ह ऑईल व्यवस्थित मिक्स करून घ्या

हे मिश्रण तुम्ही तुमच्या केसांच्या मुळाशी लावावे.

एक तासाने केस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे.

आठवड्यातून एकदा तुम्ही हा घरगुती उपाय नक्की करू शकता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com