Religious Rules:रात्री केस आणि नखे का कापत नाहीत? 99 टक्के लोकांना माहीत नसते कारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Religious Rules

Religious Rules: रात्री केस आणि नखे का कापत नाहीत? 99 टक्के लोकांना माहीत नसते कारण

हिंदू धर्मात रोजच्या दैनंदिन जिवनाविषयी अनेक रिती घालून दिलेल्या आहेत. या सगळ्या रिती रिवाजांची धर्माला मानणारे लोक विशेष काळजी घेतात. या रिती रिवाजांत एक समज असा आहे की तो म्हणजे रात्री केस आणि नखे कापू नयेत.

कदाचित तुम्ही देखील रात्री केस आणि नखे कापत नसाल. आणि कधीतरी चुकून हुकन हातांची नखे रात्री कापायला घेतली तर आजी घरातून ओरडते सगळा दिवस कमी पडला का तुला रात्री नखे काढत आहे तर बंद कर ती नखे काढणं.

पण आजी अस का बोलत अबेल याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? रात्री केस आणि नखे का कापत नाहीत? याविषयीची सविस्तर माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत.

● रात्री केस आणि नखे न काढण्याच धार्मिक कारण ?

हिंदू धर्मात असे मानले जाते की रात्री केस आणि नखे कापू नयेत. असे मानले जाते की रात्री केस आणि नखे कापल्याने लक्ष्मी माता आपल्यावर नाराज होते. याच कारणामुळे धर्म मानणारे लोक आणि घरातील वडीलधारी मंडळी रात्री केस आणि नखे कापण्यास सक्त मनाई करतात.

● आता बघू या रात्री केस आणि नखे न काढण्याच वैज्ञानिक कारण काय आहे?

रात्री केस आणि नखे न कापण्यामागे एक वैज्ञानिक कारण देखील आहे. खरं तर, रात्रीच्या वेळी आपण जेवण करणे स्वंयपाक करणे, चालणे आणि झोपणे अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी करतो. अशा वेळी जर का तुम्ही केस कापले तर ते इकडे तिकडे पडू शकतात. त्यामुळे अनेक वेळा अन्नपदार्थ खातांना केस निघतात. आणि त्या केसांमुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. यासोबतच गळलेल्या केसांमुळे आणि काढलेल्या नखांमुळे घाण आणि बॅक्टेरियाही पसरतात. यामुळे रात्री नखे आणि केस कापले जात नाहीत

हेही वाचा: आठवड्यातील 'या' दिवशी नखे का कापली जात नाही, जाणून घ्या कारण

● आता बघू या केस न कापण्याची सामान्य कारणे आहेत?

रात्री केस आणि नखे कापू नयेत हा नियम फार पूर्वीपासून बनवला गेला आहे. त्यावेळी घरांमध्ये प्रकाशाची चांगली व्यवस्था नव्हती. रात्रीच्या वेळी लोकांना मोठ्या मुश्किलीने थोडासा प्रकाश व्यवस्थापित करावा लागला. त्यामुळे केस, नखे अशी कामे सूर्यास्त होण्यापूर्वी करण्याचा नियम होता. कारण अंधारात कात्री वापरल्याने दुखापत होण्याची शक्यता होती. त्यामुळे आमच्या घरातील जेष्ठ मंडळी रात्री हे नखे काढणे केस कापणे अशा काम करण्यास नकार देतं असतं.

Web Title: Religious Rules Why You Should Not Cut Hair And Nails At Night

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top