Moong Daal Scrub
Moong Daal ScrubSakal

Moong Daal Scrub: मूग डाळीपासून बनवा फेस स्क्रब, पिंपल्सची समस्या होईल दूर

Moong Daal Scrub: चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील घरगुती पदार्थांचा वापर करू शकता.

Moong Daal Scrub how to make scrub from moong dal for glowing skin

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पिंपल्स, चिकटपणा आणि डाग यासारख्या निर्माण होणे सामान्य आहे. या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. पण काही फरक पडत नाही. जर तुम्हालाही या समस्येचा त्रास होत असेल तर ही बातमी शेवटपर्यंत वाचा. तुम्ही मूग डाळ वापरून स्क्रब बनवू शकता. यामुळे चेहऱ्यावरच्या समस्या कमी होतात. चला जाणून घेऊया स्क्रब कसा बनवायचा.

  • मुग डाळीचा वापर

प्रत्येकांच्या स्वयंपाकघरात मुग डाळीचा वापर केला जातो. लोक त्याचा वापर वरण, कोरड्या भाजी, खिचडी इत्यादी बनवण्यासाठी करतात. पण तुम्हाला माहिती आहे का की मुग डाळीचा वापर चेहऱ्यासाठीही करता येतो? मूग डाळीचा वापर त्वचा स्वच्छ करण्यासाठी आणि मुरुम कमी करण्यासाठी मदत करते.

Moong Daal Scrub
Parenting Tips: उन्हाळी सुटीत मुलांशी गट्टी कशी जमवायची, जाणून घ्या टिप्स
  • मुग डाळीचा स्क्रब बनवण्यासाठी लागणारे साहित्य

मुग डाळ

मध

दही

  • मुग डाळीचा स्क्रब कसा बनवायचा

तुम्ही मूग डाळीपासून स्क्रब बनवू शकता. यासाठी तुम्हाला मूग डाळ स्वच्छ धुवावी. नंतर रात्री पाण्यात भिजत ठेवावी. नंतर सकाळी मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि नंतर दोन चमचे मूग डाळीमध्ये एक चमचा दही आणि एक चमचा मध घाला. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. 10 मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. यानंतर तुम्ही चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावू शकता. असे आठवड्यातून 1 ते 2 वेळा करा. यामुळे चेहरा चमकदार दिसेल.

टिप: काही लोकांना मूग डाळ वापरल्यास अॅलर्जी असू शकते. चेहऱ्यावर लाल रॅशेस, पिंपल्स किंवा ॲलर्जीसारखे काही दिसले तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com