Music While Sleeping : गाणी ऐकत झोपणे योग्य की अयोग्य? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Music

Music While Sleeping : गाणी ऐकत झोपणे योग्य की अयोग्य?

Music While Sleeping : आपल्यापैकी अनेकांना रात्री झोपताना गाणी ऐकण्याची सवय असते. त्याचे अनेक फायदेदेखील आहेत. त्यात अनेक रूग्णांना म्युझिक थेरपीच्या माध्यमातून पर्यायी उपचार देण्याचाही प्रयत्न सुरू आहे.

हेही वाचाः आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

असे म्हणतात की, रात्री झोपताना शांत गाणी ऐकल्याने शांत झोप लागण्यास मदत होते. काही लोकांना गाणी ऐकल्याशिवाय झोप लागत नाही. मात्र, रात्री झोपताना गाणी ऐकणं योग्य की अयोग्य असा प्रश्न अनेकांना पडतो. आज आपण या लेखाच्या माध्यमातून याच प्रश्नचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत.

इयरफोन लावून गाणी ऐकणे शरीरासाठी हानिकारक असल्याचे अनेक अभ्यासातून समोर आले आहे. इअरफोन लावून गाणी ऐकल्याने अनेक अपघातांच्या घटना घडल्याचेही समोर आले आहे. रात्रीच्यावेळी इअरफोन लावून गाणी ऐकल्याने याचा थेट परिणाम कानांच्या आरोग्यावर होतो. यामुळे याचा परिणाम झोपेवरही होऊ शकतो. आपल्या शरीरात सर्कॅडियन रिदम नावाचे अंतर्गत घड्याळ असते.

सर्कॅडियन रिदम हे 24 तासांच्या शरीराच्या घड्याळासारखे आहे. जे वातावरण आणि प्रकाश बदलत असताना आपल्या झोपेचा आणि जागृत होण्याच्या वेळेचा मागोवा ठेवण्याचे काम करते. चांगल्या प्रकारच्या सर्केडियनमुळे मेंदू दिवसभर सतर्क राहण्यास मदत होते, ज्यामुळे दिवसभर चांगले कार्य करण्यास मदत होते. पण, जेव्हा आपण शरीराला सर्केडियनशिवाय दुसऱ्या आवाजांवर अवलंबून होण्यास सुरूवात करतो. त्यावेळी ही सवय शरीरासाठी धोकादायक ठरू शकते.

झोपताना गाणी ऐकल्याने काय होते?

रात्री झोपताना गाणी ऐकल्याने आपला मेंदू सक्रीय मोडमध्ये राहतो. कारण ज्यावेळी आपण गाणी ऐकत असतो. त्यावेळी अनेकांचा मोबाईल फोनही आजूबाजूलाच असतो. त्यात अनेकांना सतत गाणी बदलण्याची सवय असते. त्यामुळे शरीर सतत सक्रीय राहते. अशा परिस्थितीत शरीराल विश्रांती मिळत नाही. तसेच पुरेशी झोप घेण्यास अडथळे निर्माण होतात. यामुळे आरोग्याशी संबंधित विविध आजारांना सामोरे जावे लागण्याची वेळ उद्भवू शकते.

झोपताना हाय व्हॉल्यूममध्ये गाणी ऐकण्याच्या सवयीमुळे शांत झोप लागण्याऐवजी त्याचे अधिक घातक परिणाम शरीरावर होऊ शकतात. झोपताना इअरफोन लावून गाणी ऐकल्याने कानाच्या त्वचेवर दाब पडतो, ज्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

कशी ऐकवी गाणी

तुम्हाला गाणी ऐकल्याशिवाय रात्रीच्यावेळी झोप लागत नसेल तर, तुम्ही इअरफोन ऐवजी सामान्यपणे गाणी ऐकण्याची सवय करा. यावेळी शक्यतो मोबाईल बेडपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच गाण्यांचा आवाज मर्यादित ठेवाय यामुळे तुमच्या झोपेवर याचा परिणाम होणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गाणे ऐकत ऐकत झोपण्याची सवय बंद करून अशी एखादी सवय किंवा जीवनशैली निवडावी ज्यामुळे तुम्हाला रात्रीची झोप आपोआपच लागेल.