
Mutual Fund Guide : हे तीन संकेत मिळताच म्युचुअल फंडमधून काढून घ्या पैसे, चांगले रिटर्न्स मिळतील
Mutual Fund Guide : आजकाल नोकरी लागताच क्षणी लोक पैसा गुंतवण्याकडे जास्त कल देतात. पगारातील एक छोटा हिस्सा म्युच्युअल फंड, एसआयपी सारख्या सेव्हिंग प्लान्समध्ये गुंतवण्यात सध्याचे लोक जास्त रस दाखवत आहेत.
आर्थिक सल्लागारही म्युच्युअल फंडांत गुंतवणुकीचा सल्ला देतात. याचे कारण म्हणजे कमी खर्चात जास्त वेळेसाठी केलेली गुंतवणूक तुम्हाला चांगले रिटर्न्स देऊ शकते.
त्यामुळेच एफडी, सेव्हिंग्जसोबतच आता म्युच्युअल फंड आणि एसआयपी यांवर विश्वास ठेऊन लोक गुंतवणूक करत आहेत. तुम्हीही यामध्ये गुंतवणूक केली असेल तर आजची ही बातमी नक्की वाचा. (Mutual Funds)
याचं कारण असं की, म्युच्युअल फंडात केलेल्या गुंतवणुकीची रक्कम एका विशिष्ट संकेत मिळताच काढावी. याचे कारण असे की, काही गोष्टींत न अडकता लगेचच पैसे काढणे काही वेळा फायद्याचे ठरू शकते. ते कोणते संकेत आहेत हे पाहुयात.
शॉर्ट टर्मचा विचार केला तर
सर्वात आधी ही गोष्ट क्लिअर करा की, म्युच्युअल फंडात केलेली गुंतवणूक तेव्हाच फायद्याची ठरते जेव्हा ती लाँग टर्मसाठी केले जाते. याचे कारण असे की, तुम्ही कितीही रक्कम गुंतवली तरी ती जास्त काळासाठी तिथे ठेवलीत तरच तुम्हाला जास्त फायदा होईल.
अशात जर तुम्ही शॉर्ट टर्ममधील गुंतवणूकीचा विचार करत असाल तर म्युच्युअल फंडातले पैसे काढलेलेच बरे. त्यामुळे तुम्हाला नक्की किती काळासाठी बचत करायची, त्यातून तुम्हाला किती रिटर्न्स मिळतील याचा विचार करूनच पैसे गुंतवा. (Investment Tips)
फंडातून जास्त रिटर्न्स नसतील तर
म्युच्युअल फंड हे शेअर मार्केटवर अवलंबून असते. जर, तुम्ही गुंतवलेल्या कंपनीचे प्रदर्शन योग्य पद्धतीने होत नसेल. तुम्ही त्यातून पैसे काढलेले कधीही सुरक्षित निर्णय ठरेल. पण, हा निर्णय घेताना कमीतकमी दोन वर्षांतील परफॉर्मन्सची तुलना करा आणि मगच म्युच्युअल फंडातून माघार घेण्याचा विचार करावा, असा सल्ला आर्थिक सल्लागार देतात.
कंपनीने नियमात बदल केले तर
काहीवेळा तुम्ही ज्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल. त्या कंपन्या काहीवेळा त्यांच्या नियमात बदल करतात. त्यामुळे जितके रिटर्न्स आपल्याला मिळायला हवेत, तितके मिळत नाहीत.
तेव्हा तुम्ही योग्य तो निर्णय घेणं गरजेच आहे. कारण कंपनीने त्यांच्या निर्णयात केलेला बदल तुम्हाला नुकसानदायक ठरू शकतो. त्यामुळेच तुम्ही लवकरात लवकर निर्णय घेऊन गुंतवणुकीसंबंधी योग्य निर्णय घ्या.