Nag Panchami 2023 : प्रयागराजमधील नागवासुकी मंदिरातील दगड प्रसाद म्हणून घरी का नेतात?

नागवासुकी मंदिराच्या दगडांचे गूढ काय आहे
Nag Panchami 2023
Nag Panchami 2023esakal

Nag Panchami 2023 : आपल्या देश हा मंदिरांचा देश म्हणून ओळखला जातो. आपल्या पुर्वजांनी बांधलेली दगडाची भक्कम मंदिरे आजही दिमाखात उभी आहेत. इथे गल्लोगल्ली एखादं तरी मंदिर नक्कीच पहायला मिळतं. आज नागपंचमी आहे.

ग्रह-नक्षत्रांच्या विशेष संयोगामुळे यंदा नागपंचमीचे महत्त्व लक्षणीयरीत्या वाढले आहे. या निमित्ताने नागदेवांच्या मंदिरांमध्ये आणि इतर शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी असते.

लोक नाग देवतांना दूध अर्पण करून आणि रुद्राभिषेक करून कालसर्प दोषापासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करत असतात. त्यानिमित्तानेच अशा एका मंदिराविषयी माहिती घेऊयात जिथे भक्त दगडांचा प्रसाद घरी नेतात.(Nag Panchami 2023 : prayagraj unique nagavasuki temple of snakes know the mystery of temple )

Nag Panchami 2023
Nag Panchami Special Recipe : नागपंचमी स्पेशल पारंपारिक पुरणाचे दिंड कसे तयार करायचे?

नागपंचमीनिमित्त प्रयागराज येथे नागवासुकी या नागदेवतेच्या मंदिरात भाविक गर्दी करतात. संगमाच्या काठावर असलेल्या नागवासुकी मंदिरात सर्वाधिक गर्दी असते. येथे भाविकांची मोठी गर्दी असते. प्रयागराजमध्ये नागपंचमीला विशेष महत्त्व आहे कारण संपूर्ण नागवंशाचे स्वामी भगवान तक्षक आणि नागराज वासुकी यांचे मूळ निवासस्थान आहे.

नागराज वासुकी आणि भगवान तक्षक यांच्या मंदिरात स्थापित नागदेवतांना सोन्या-चांदीचे दागिने आणि फळे, फुले आणि यांनी सजवण्यात आले आहे. मंदिरांचे दरवाजे उघडण्यापूर्वीच येथे भाविकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. (Nag Panchami 2023)

Nag Panchami 2023
Nag panchami 2023 : नागपंचमीच्या दिवशी जरूर करा या सातपैकी एक उपाय, होतील फायदे

भाविक दूध आणि पाणी अर्पण करतात

नागपंचमीच्या दिवशी भाविकांनी नाग मंदिरात दूध-पाणी अर्पण करून आपले कुटुंब आणि कुळाला सापांच्या छायेपासून दूर ठेवण्याची प्रार्थना करतात. या मंदिरात येणारे भक्त तिथे असलेला दगडांचा प्रसाद घरी न्यायला अजिबात विसरत नाहीत.

Nag Panchami 2023
Nag Panchami 2023 : सर्पदंश झाल्यास नागदेवाची कृपा असलेल्या या गावात जा, विषापासून मिळेल मुक्ती!

नागवासुकी मंदिराच्या दगडांचे गूढ

प्रयागराजमध्ये असलेल्या या नागवासुकी मंदिरातून दगड घेऊन घराभोवती ठेवणाऱ्यांना कधीही साप आणि नागांची भिती नसते. इतकंच नाही इथले दगड घराभोवती ठेवणाऱ्यांचीही सर्पदोषांपासून सुटका होते.

पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनानंतर नागराज वासुकी पूर्णपणे रक्तबंबाळ झाले होते. आणि भगवान विष्णूच्या सल्ल्यानुसार त्यांनी प्रयागराजमधील या ठिकाणी विश्रांती घेतली होती. इथे नागराजांचे एक प्राचिन मंदिर तयार झाले.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com