

What Is Nautapa? Religious and Scientific Reasons Behind the Hottest 9 Days of the Year
sakal
Religious and Scientific Reasons Behind the Hottest 9 Days of the Year: मे महिन्याच्या अखेरीस अचानक ऊन इतकं वाढतं की बाहेर पडतानाच अंगाची लाही लाही होते. अनेक ठिकाणी तापमान ४० अंशांच्या पुढे जातं, वारे सुद्धा गरम वाहायला लागतात आणि दुपारच्या उन्हात काही मिनिटं उभंसुद्धा राहणं कठीण होतं. याच कडाक उष्णतेच्या कालावधीला “नवतापा” किंवा “नौतपा” असं म्हटलं जातं. हिंदू पंचांग आणि ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ वर्षाताल सर्वात उष्ण मानला जातो. त्यामुळे या काळात काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं.