Navratri 2023 : नवरात्री आणि नऊ रंगांचा खरंच काही संबंध आहे का?

दुर्गामाता तुम्ही घातलेले रंग नाहीतर तुमची भक्ती पाहून प्रसन्न होते
Navratri 2023
Navratri 2023 esakal

Navratri 2023 :  नवरात्रोत्सवाला लवकरच सुरूवात होणार आहे. नवरात्रीच्या उत्साहात संपूर्ण देश वाहून निघतो. जल्लोषात दुर्गामातेचे स्वागत मंडळांमध्ये केले जाते. तर, घरोघरी घटस्थापनाही केली जाते. नवरात्रीचे नऊ दिवस एखाद्या सोहळ्याप्रमाणे  साजरे केले जातात.

या नऊ दिवसात अनेक गोष्टी पाळल्या जातात. बोली भाषेत घट बसणे म्हणजे देव आपल्या घरात बसणे असा अर्थ होतो. त्यामुळे घरात बसवलेल्या घटाची रोज आरती केली जाते. त्याला माळ अर्पण केली जाते. नवरात्री रास-गरब्याची धूमही पहायला मिळते.

नवरात्रीत अजून एक गोष्ट मोठ्या प्रमाणात होते ती म्हणजे महिला वर्गांचे नवरात्रीचे नऊ रंग. या नऊ दिवसात प्रत्येक दिवशी वेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याचा ट्रेंड आला आहे. वेगवेगळे महिलांचे ग्रूप, कर्मचारी महिला या रंगाचे पालन करतात आणि त्याच साड्या, ड्रेस घालून जातात. यात पुरूषही सहभाग नोंदवू लागले आहेत. (Navratri 2023)

Navratri 2023
Navratri Festival 2023 : खापा शहरातील ३०० वर्षे जुन्या भवानी मंदिरात नवरात्रोत्सव

पण, नवरात्री आणि या नऊ रंगांचा खरंच काही संबंध आहे का? याला शास्त्रात काही मान्यता आहे का? असा विचार तुम्ही कधी केलाय का? नक्कीच नाही. कारण नवरात्रीत कोणत्या रंगांचे पालन करावे हे महिनाभर आधिपासूनच सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

याचा पाठपुरावा न करता आपण या गोष्टी कधी फॉलो करायला लागलो हे आपल्यालाही कळले नसेल.  याच विषयी आपण सविस्तर माहिती इतिहास संशोधक आणि ॲड.प्रसन्न मालेकर यांच्याकडून माहिती घेऊयात.

Navratri 2023
सूर्यग्रहणाच्या छायेत सुरु होणार नवरात्री,या राशीच्या लोकांना होणार लाभ

रंग आणि नवरात्री यांचा फारसा संबंध नाही. नवरात्री म्हणजे जगदंबेचा जागर. तिच्या जागराला विशिष्ट रंगांचे कपडे घालावेत याचे पुराणात तरी उल्लेख सापडत नाहीत. शेवटी तुम्हीही कोणताही रंग असलेले कपडे घातले तरी देवीला तुमची भक्तीच दिसते.

पण, हे रंगांचे खुळ इतके पसरले आहे की, एखादी गरीब स्त्रीही आपण आज त्या रंगांची साडी नेसली नाही तर देवीचा कोप होईल असे समजते.

ज्यांना हे रंगांच्या साड्या घेणं परवडतं ते नक्कीच हौसेने करतात. पण ज्यांना या गोष्टी परवडत नाहीत ते देवीची अवकृपा होईल म्हणून या गोष्टी पाळतात. खरंतर रंगांच्या नावाने भक्तांच्या मनात एक भितीच बसली आहे. त्यामुळे या गोष्टी पाळणं खरंच महत्त्वाचं आहे का, यावर विचार करणं गरजेचं आहे.  

Navratri 2023
Navratri 2023 : उपवासाला ‘नो भात, नो पुलाव’; असा बनवा नवरात्री स्पेशल फराळी पुलाव!

पुराण आणि महात्म्यात जेव्हा रंग आणि दिवस यांचा संबंध येतो तेव्हा नवग्रहांचा उल्लेख प्रकर्षाने करावाच लागतो. कारण, प्रत्येक दिवशी नऊ ही ग्रहांचा होरा (प्रभावकाल) असतो. सूर्योदयाला ज्या ग्रहांचा  होरा असतो त्याचे नाव त्या वाराला मिळते. त्या ग्रहाचे स्वामित्व त्या वारावर मानले जाते त्याची अनुकुलता (अनुकुलता म्हणजे त्या ग्रहांची कृपा) यावी.

म्हणून त्या ग्रहांचा मंत्र जप हवन रत्न धारण दान इ करण्याची मान्यता आहे. अशातच ग्रहांचे रंग ही ठरलेले आहेत जो ग्रह अनुकूल नाही त्याच्या आवडत्या रंगाचे वस्त्र वापरणे हा सोपा उपाय मानतात. हे रंग असे,

  1. रविवार -  केशरी /भगवा

  2. सोमवार-  ऑफ व्हाईट

  3. मंगळवार-  लाल

  4. बुधवार-  हिरवा

  5. गुरुवार-  पिवळा

  6. शुक्रवार-   पांढरा

  7. शनीवार-   निळा/ काळा

Navratri 2023
कोडोलीचे ग्रामदैवत अंबाबाईदेवीचे मंदिर नवरात्री उत्सव साठी सज्ज

केवळ याच गोष्टीचा उल्लेख पुराणात आहे. हे रंग सोडून नवरात्रीच्या रंगांचा काहीही उल्लेख नाही. मग हे फॅड आलं कुठून. तर काही प्रसारमाध्यमांनी व्यवसाय वाढावा यासाठी नवरात्र महोत्सवाच्या आधी रंगाच वेळापत्रक जाहीर करायला सुरुवात केली‌.

हळूहळू हे लोण इतकं पसरलं की या दिवशी ठरलेला रंग  घालणं हे कुठंतरी धर्मशास्त्र असल्या सारखं मानलं जायला लागले. आणि जर अशा रंगाचे कपडे घातले नाहीत तर काही अशुभ घडेल की काय अशी भीती देखील व्यक्त केली जायला लागली.

मातांनो, जे आवडेल ते नेसा जे शोभेल ते घाला तुम्ही नवरात्राच्या नवरंग पाळलेच पाहिजे. असे कुठेही लिहिलेले नाही जसं आवडेल तसं पण सगळ्याजणी ठरवून एकाच रंगात नटणार असाल तर वाईट काहीच नाही. पण हे असं केलं पाहिजे असं कुठलंही बंधन धर्माने परंपरेने तुमच्यावर लादलेले नाही,असेही ॲड.मालेकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com