Navratri 2023: नवरात्रीत आपल्या मेहंदीने करा सर्वांना इम्प्रेस! झटपट काढून होणारे सोपे डिझाईन्स; पाहा व्हिडिओ

भारतात ठिकठिकाणी नवरात्रीचा उत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो.
Navratri
Navratri sakal

नवरात्रीचा सण खूप खास आहे. नवरात्रीचा उत्सव दुर्गा देवीला समर्पित आहे. शारदीय नवरात्रीला 9 दिवसांसाठी, देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते.

महिलांसाठी नवरात्री हा सण महत्वाचा मानला जातो, आदी शक्तीची नवरात्रीला पूजा केली जाते, महिला सोलाह शृंगार करतात आणि आदी शक्तीची मनोभावे पूजा करतात. मेहेंदीचे सोलाह शृंगारमध्ये खूप महत्व आहे. मेहंदी प्रत्येक सणात महत्वाची असते.

तुम्हालाही नवरात्रीत तुमच्या हातावर मेहंदी लावायची असेल, तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की मेहंदीचे कोणते डिझाईन्स सर्वोत्तम आहेत.

बॅक साईड मेहंदी डिझाइन

जर तुम्हाला तुमच्या तळहाताच्या मागील बाजूस मेहंदी लावायची असेल तर तुम्ही ही डिझाइन काढू शकता. हे दिसायला खूप सुंदर आहे. सणासुदीच्या दिवसात पूर्ण हातावर मेहंदी चांगली दिसते. आपण ते सहजपणे काढू शकता.

Navratri
Navratri 2023 : नवरात्रीला गरबा दांडियासाठी ट्राय करा या लेटेस्ट डिझायनर लेहंगा चोली, दिसाल हटके

अरेबिक मेहंदी डिझाइन

या नवरात्रीत, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही अरेबिक मेहंदी डिझाइन देखील काढू शकता. हे डिझाइन असे आहे की ते लावण्यासाठी करण्यासाठी तुम्हाला 10 ते 15 मिनिटे लागतील. ही मेहंदी तुम्ही तुमच्या हाताच्या पुढच्या आणि मागच्या बाजूला लावू शकता.

देवीच्या मूर्तीची डिझाइन

तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही नवरात्रीच्या स्पेशल मेहंदीमध्ये तुमच्या हातावर देवीच्या मूर्तीची डिझाइन काढू शकता. ही इतर मेहंदीपेक्षा खूप वेगळी असेल आणि ती सुंदरही दिसते. हे स्वतः करणे खूप कठीण आहे. यासाठी तुम्हाला एक्सपर्टची मदत घ्यावी लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com