
Navratri Fashion : नवरात्री जवळ आली की प्रत्येकाला गरब्याचे वेध लागतात. नऊ दिवस नवदुर्गेची पूजा आरती आणि गरब्याचा गोंधळ असतो. कोलकाता, गुजरात वाराणसी या ठिकाणी नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. गरब्याला काय घालायचे, कोणता आउटफिट, कसा मेकअप आणि हेअरस्टाइल यावर तरूणी लक्ष देतात. पण त्यावर कोणते फुटवेअर घालायचे? याकडे जास्त लक्ष दिले जात नाही. पण परफेक्ट लूकसाठी फुटवेअरवरही परफेक्ट असणे खूप गरजेचे आहे.
गरबा खेळताना स्त्रिया लेहेंगा-चोली घालतात. त्यामुळे त्यावर जुती किंवा मोजडीच घातली जाते. पण, गरब्यासाठी नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी फक्त एकाच प्रकारचे फुटवेअर घालणे चुकीचेच. मोजडी व्यतिरिक्त आपल्याकडे बरेच पर्याय आहेत. तुम्हाला नवरात्रीत लेहेंगा-चोलीसोबत अगदी सहज घालता येणारे फुटवेअर पाहुयात.
मोजडी
मोजडी हे ट्रॅडिशनल स्टाईलमधील बॅलेरिना फूटवेअर आहे. लेहेंगा-चोलीसोबत एथनिक लुक देते. आजच्या काळात, महिलांसाठीचे शूज एक स्टाईल स्टेटमेंट तयार करतात. जे कोणत्याही वयोगटातील महिला सहजपणे परिधान करू शकतात. मोजडीची खासियत म्हणजे त्या खूप आरामदायी असतात. त्यामुळे गरबा करताना ते घालायला हरकत नाही. यामध्ये तुम्ही बीडपासून ते स्टोन आणि फ्रिंज लुक इत्यादी व्हराय़टी आहेत.
वेजेस हील्स फूटवेअर
तुम्हाला नवरात्रीत गरबा करायचा असल्याने तुम्ही हिल्स घालणे टाळावे. पण जर तुमची उंची कमी असेल तर तुम्ही वेजेस हील्स घालून तुमचा लुक खास बनवू शकता. लेहेंगा-चोलीसह वेज हील्स फुटवेअर स्टाईल करा. पेन्सिल हील्स आणि इतर हिल्सपेक्षा ते अधिक आरामदायक आहेत.
फ्लिप-फ्लॉप
फ्लिप-फ्लॉप किंवा फ्लॅट्स फुटवेअर फक्त कॅज्युअल वापरासाठी असतात असे मानले जाते. पण प्रत्यक्षात तसे नसून बाजारात फ्लॅट्स फुटवेअरच्या अनेक व्हरायटी उपलब्ध आहेत. लेहेंगा-चोलीवर घालता येतील असे फ्लॅट चपला सध्या ट्रेंडी आहेत. या चपला आरामदायक असल्याने त्या गरबा रात्रीसाठी एक चांगला पर्याय ठरतात.
स्नीकर्स
काही दिवसांपासून लेहेंगा-चोलीसोबत स्नीकर्स घालण्याचा ट्रेंडही खूप वाढला आहे. तूम्हालाही तूमच्या फुटवेअरला ‘सेंटर ऑफ अट्रॅक्शन’ बनवायचे असेल तर, स्नीकर्स नक्की ट्राय करा. कोणत्याही लेहंग्यावर पांढरे स्नीकर्स आकर्षक वाटतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.